'आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो...', प्रथमेश परबचा होणाऱ्या पत्नीसाठी हटके उखाणा

प्रथमेश हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. येत्या 14 फेब्रुवारी 2024 रोजी त्या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे.

Updated: Jan 17, 2024, 09:00 PM IST
'आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो...', प्रथमेश परबचा होणाऱ्या पत्नीसाठी हटके उखाणा title=

Prathamesh Parab Special Ukhana : गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी कलाकार हे विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. अमृता देशमुख-प्रसाद जवादे, हार्दिक जोशी-अक्षया देवधर, सुरुची अडारकर- पियुष रानडे, स्वानंदी टीकेकर-आशिष कुलकर्णी, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर यांच्यापाठोपाठ आता आणखी एक मराठमोळा अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रथमेश परबने काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकणार असल्याची घोषणा केली होती. 

‘टाईमपास’ या मराठी चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात पोहोचला. या चित्रपटात त्याने दगडू हे पात्र साकारले होते आणि त्यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली. प्रथमेश हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. येत्या 14 फेब्रुवारी 2024 रोजी त्या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. आता त्यांच्या केळवणाला सुरुवात झाली आहे.  यादरम्यान प्रथमेशने क्षितीजासाठी एक खास उखाणा घेतला. 
आणखी वाचा : सई ताम्हणकरला हवाय 'असा' जोडीदार, म्हणाली 'लग्न झालेले...'

प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकरने नुकतंच 'इट्स मज्जा' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी प्रथमेश आणि क्षितीजाला उखाणा घेण्यास सांगितले. त्यावेळी त्याने 'टाइमपास' आणि 'टाइमपास २' या त्याच्या दोन्हीही सुपरहिट चित्रपटाचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख केला. यावेळी त्याने हटके उखाणाही घेतला. ''दगडूची होती काजू कतली आणि पराजू पतली, आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो, क्षितीजा लय मेहनतीने पटली'', असा उखाणा प्रथमेशने घेतला. त्याचा हा उखाणा सध्या चांगलाच चर्चेत आहे. 

दरम्यान या मुलाखतीदरम्यान प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकरने त्यांची लव्हस्टोरीही सांगितली आहे. यावेळी क्षितीजा म्हणाली, प्रथमेशने 14 फेब्रुवारी 2020 माझी व्हॅलेंटाइन डे स्पेशल फोटोशूट सीरिज बघून मला पहिल्यांदा मेसेज केला. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2021 मध्ये आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. तसेच 14 फेब्रुवारी 2022 ला आमच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झालं. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2023 ला आम्ही रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावर जाहीर केले. आता येत्या 14 फेब्रुवारी 2024 ला आमच्या रिलेशनशिपला 3 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे मग काहीतरी स्पेशल करायला हवं, यामुळेच आम्ही 14 फेब्रुवारीला साखरपुडा करणार आहोत, असे तिने सांगितले.