PHOTO : 'या' अभिनेत्रीशी सिद्धार्थ चांदेकरचा साखरपुडा

त्याच्या आयुष्यात आनंदाची उधळण करणारी 'ती' म्हणजे.... 

Updated: Jan 25, 2019, 01:08 PM IST
PHOTO : 'या' अभिनेत्रीशी सिद्धार्थ चांदेकरचा साखरपुडा title=

मुंबई : मागील वर्षाप्रमाणेच नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनही लग्नसराई आणि एकंदरच आनंदाचे, उत्साहाचे वारे कलाविश्वात वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच आनंदी वातावरणात अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरही सहभागी झाला आहे. सिद्धार्थची सोशल मीडिया पोस्ट पाहून लगेचच याचा अंदाज लावता येत आहे. 

विविध चित्रपटांतून आपल्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सिद्धार्थच्या आनंदाचं कारणंही तसंच आहे. अभिनेत्री मिताली मयेकर हिच्यासोबत त्याचा साखरपुडा झाला असून, एका नव्या नात्याची आणि नव्या प्रवासाची सुरुवात त्या दोघांनीही केली आहे. सिद्धार्थने स्वत:च सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याविषयीची माहिती दिली. 

'Welcome to our beginning', असं कॅप्शन लिहित त्याने साखरपुडा समारंभातील काही फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये ते दोघंही अगदी सुरेख दिसत आहेत. सोशल मीडियावरुन आपल्या नात्यातील या खास क्षणाची माहिती देणाऱ्या सिद्धार्थला चाहत्यांनीही शुभेच्छा दिल्या. 

२०१८ मध्ये व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने त्याने मितालीसोबतच्या नात्याविषयीची अधिकृत माहिती सर्वांनाच दिली होती. तिच्यासोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर त्याने नेहमीच चाहत्यांसमोर या नात्याची सुरेख बाजू ठेवली. त्यामुळे #CoupleGoals देण्यात हा अभिनेता आणि त्याची BAE मिताली कुठेच कमी पडले नाहीत असंच म्हणावं लागेल. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x