प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने प्रथमेश परब आणि क्षितीजाला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला...

प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांच्या लग्नाला अनेक कलाकार आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली. पण आता त्याच्या एका अभिनेता मित्राने त्याला खास सल्ला दिला आहे. 

Updated: Feb 28, 2024, 04:17 PM IST
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने प्रथमेश परब आणि क्षितीजाला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला... title=

Yashoman Apte Advice To Prathamesh Parab : महाराष्ट्राचा लाडका 'दगडू' अशी ओळख असणारा अभिनेता प्रथमेश परब हा नुकताच विवाहबंधनात अडकला. 'टाईमपास' या चित्रपटामुळे तो खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरबरोबर लग्नगाठ बांधली. प्रथमेश आणि क्षितीजा हे 24 फेब्रुवारी 2024 ला विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता प्रथमेशच्या लग्नानंतर अभिनेता यशोमन आपटेने त्याला एक सल्ला दिला आहे. 

प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांच्या लग्नाला अनेक कलाकार आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली. नुकतंच अभिनेता यशोमन आपटेने त्याच्या लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. "खूप खूप अभिनंदन प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर. तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा!!! खूप छान आयुष्य जगा! एकमेकांना सांभाळून घ्या, समजून घ्या! खूप प्रेम करा आणि सुखी रहा", असा सल्ला यशोमन आपटेने दिला आहे. त्याबरोबरच यशोमनने 'पप्याचं लग्न', 'पप्या की शादी', 'लव्ह यू ब्रो', असे हॅशटॅगही शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yashoman Apte (@apt_yashomaan)

 
यशोमन आपटेच्या या पोस्टवर प्रथमेशनेही प्रतिक्रिया दिली आहे. "धन्यवाद भावा, लव्ह यू", असे प्रथमेश परबने म्हटले आहे. तसेच क्षितीजानेही "खूप खूप धन्यवाद" म्हणत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. दरम्यान प्रथमेश आणि क्षितीजा यांच्या मेहंदी, हळदी, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी आणि गुलाबी रंगााचा शेला घेतला होता. तर, प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा आणि गुलाबी रंगाचे धोतर परिधान केले होते. तसेच गुलाबी व पिवळ्या रंगाचा फेटाही बांधला होता. या लूकमध्ये दोघे खूप सुंदर दिसत होते. त्यानंतर रिसेप्शनच्या वेळी प्रथमेशने ब्लेझर सूट असा लूक केला होता. तर क्षितीजाने जांभळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. यात ते दोघेही फारच सुंदर दिसत होते. 

प्रथमेश-क्षितीजा यांची पहिली ओळख इन्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर आता त्या दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला.