ही मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाह बंधनात

2017  हे वर्ष मराठी कलाकारांसाठी खास होतं. 

Updated: Jan 11, 2018, 11:10 PM IST
ही मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाह बंधनात
Bathsheva facebook page

मुंबई : 2017  हे वर्ष मराठी कलाकारांसाठी खास होतं. 

या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली. अशीच काहीशी सुरूवात 2018 या वर्षाची आहे. हे वर्ष देखील लग्नाचं वर्ष ठरणार असं वाटतंय. अशीच काहीशी खुश खबर आणखीन एका अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना दिली आहे. 

'राजवाडे अॅण्ड सन्स' फेम अभिनेत्री कृतिका देव विवाहबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड आणि अभिनेता अभिषेक देशमुखसोबत कृतिकाने रजिस्टर मॅरेज केले आहे. लग्नाचा जास्त गाजावाज न करता मोजक्याच नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 

लग्न 6 जानेवारी रोजी पार पडले आहे पण कृतिका आणि अभिषेकने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची माहिती दिली आहे.नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. या फोटोंमध्ये नववधू कृतिकाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. कृतिकाने 'राजवाडे अॅण्ड सन्स', 'हॅपी जर्नी' आणि 'हवाईजादा' यांसारख्या  सिनेमात काम केले असून 'प्रेम हे'मालिकेच्या सिरीजमध्ये या प्रथमेश परबसोबत काम होते केले.यात त्या दोघांची लहानवयात असणारी प्रेमकथा दाखवण्यात आली होती.तसेच अभिषेकही व्यवसायाने अभिनेता,दिग्दर्शक तसेच लेखकही म्हणून काम करतो.अभिषेकने 'पसंत आहे मुलगी' या मालिकेत पुनर्वसूची भूमिका साकारली होती.

 2018 वर्षात कोणते चेहरे विवाहबंधनात अडकतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. काहींनी साखरपुडा करत 2018चा मुहुुर्तात लग्न करणार असल्याचेही म्हटेल आहे.त्यामुळे 2018मध्ये कृतिका आणि अभिषेक पाठोपाठ आणखीन कोणते अभिनेता अभिनेत्री  बोहल्यावर चढणार याचीच उत्सुकता चाहत्यांनाही असणार हे मात्र नक्की.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x