मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केलं कंगना रानौतचं घर

बॉलिवूडनं आजवर अनेक कलाकारांना मोठं केलं. नुकतंच एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने मुंबईत स्वत:च घर खरेदी केलं आहे. 

Updated: Feb 21, 2024, 06:49 PM IST
मराठमोळ्या अभिनेत्रीने खरेदी केलं कंगना रानौतचं घर title=

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरचं यश कोणापासून लपलेलं नाही. आता या अभिनेत्रीने मुंबईत स्वत:च घर खरीदलं आहे. ज्याचं कनेक्शन कंगना रानौतसोबत आहे. ज्या घरावर मृणाल ठाकूरची नेमप्लेट लागली आहे त्या घरात कधीकाळी कंगना रानौतचे वडिल आणि भाऊ राहायचा. आता या फ्लॅटची मालकिण मृणाल ठाकूर बनली आहे.

झूमच्या एका रिपोर्टनुसार, मृणाल ठाकूरने वेस्ट मुंबईत एक फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट आधी कंगना रानौतच्या वडिवांच्या आणि भावाच्या नावावर होता. आता मृणाल ठाकूरची ही डिल एका ब्रोकरच्या माध्यमातून झाली आहे. तिने आपल्या पसंतीच्या हिशोबाने फ्लॅटचं कामदेखील करायला सुरुवात केली आहे. 

 रिपोर्टमध्ये रजिस्ट्री पेपरवर दिलेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी २०२४ ला कागदीपत्र कामकाज झालं होतं. पहिला फ्लॅट  ९४.९४ स्क्वेअर मीटरमध्ये आहे. ज्याची स्टाम्प ड्यूटी 30 लाख रुपये भरली गेली आहे. तर दुसरीकडे फ्लॅटचा दूसरा भाग 92.66 स्क्वेअर मीटरमध्ये आहे. या घराची किंमत १० करोड रुपये  इतकी आहे.

Mrunal Thakur ने नेपोटिझमवर केलं होतं वक्तव्य 
आम्ही तुम्हाला सांगतो की, मृणाल ठाकूर ही एक अशी अभिनेत्री आहे. जिने मनमोकळेपणाने आपल्या मनातील गोष्टी सगळ्यांसमोर सांगितल्या आहेत. एकदा अभिनेत्रीने या गोष्टीचाही स्विकार केला होता की, कसे स्टारकिड्सकडे लक्ष दिलं जातं. नेपोटिझम केवळ त्यांच्यामुळे नाही तर अनेक गोष्टींमुळे आहे. तिने एक किस्सा सांगत या बाब संपवून टाकली.

मृणाल ठाकूरने सांगितली संपूर्ण गोष्ट
मृणाल ठाकूरने सांगितलं की, एक अवॉर्ड फंक्शन चालू होतं. या दरम्यान तिला बेस्ट एक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला. ती भाषण देत होती, इतक्यात तिच्या जवळून एक स्टारकिड्स तिच्या बाजून गेली तितक्यात सगळेच पापाराझी  तिच्या जवळ गेले आता त्यावेळी ती त्या स्टारकिडला चूकिचं नाही ठरवणार इथे ना ती त्या स्टारकिडवर जळत मात्र यागोष्टीचं तिला फार वाईट वाटलं कि कशाप्रकारे मिडीयाने तिला ट्रिट केलं.

टीव्हीच्या दुनियेपासून फिल्मी कॉरिडॉरपर्यंतचा अद्भुत प्रवास प्रत्येकाला शक्य नाही. पण मृणाल ठाकूर या प्रवासात तिच्या गतीने पुढे जात आहे. दमदार अभिनयासह तिच्या साधेपणाचं सौंदर्य कोणाचंही मन मोहून टाकण्यास पुरेसं आहे.