प्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

तिचं हे रुप पाहताक्षणी मनात घर करत आहे   

Updated: Oct 18, 2020, 11:12 AM IST
प्रत्येक स्त्रीमध्ये आहे 'दुर्गा'; लक्षवेधी रुपातील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नवरात्रोत्सवाच्या मंगलपर्वाला नुकतीच सुरुवात झाली. कोरोना व्हायरसचं संकट पाहता या पार्श्वभूमीवर यंदा या उत्सवाची भव्यता पाहायला मिळत नसली, तरीही त्याबाबत असणारी उत्सुकता आणि उत्साह मात्र तसुभरही कमी झालेला नाही. आदिशक्तीच्या रुपांची आराधना करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीनं शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. 

कलाविश्वातील कलाकार मंडळीसुद्धा यात मागे राहिलेले नाहीत. आदिशक्तीचा जागर करण्यासाठी म्हणून त्यांनी या कलेचाच आधार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर मराठमोळ्या अभिनेत्रीनं घेतलेलं दुर्गा रुप हे त्याचंच प्रतिक. 

दुर्गा, पार्वती, अन्नपूर्णा अशा विविध रुपांमध्ये दिसणारी 'ती' सर्वशक्तीशाली आहे, हे विसरुन चालणार नाही. मुळात स्त्री ही कोणत्याही रुपात आदिशक्तीचंच एक रुप असते हेच सांगणारी आणि छायाचित्रांच्या रुपातून हे उलगडणारी ही अभिनेत्री आहे, रुपाली भोसले. 

 
 
 
 

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle) on

 

रुपालीनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिचं रुप पाहतेवेळी खऱ्या अर्थानं एका वेगळ्या शक्तीची अनुभूती झाल्यावाचून राहत नाही. सोबत तिनं लिहिलेलं कॅप्शन आणि तिच्या या लूकसाठी प्रत्येकानं घेतलेली मेहनत या गोष्टीसुद्धा फॉलोअर्सची दाद मिळवून जात आहेत.