'तुला चित्रपटात काम मिळत नाहीत म्हणून...', बोल्ड फोटोशूटमुळे सई ताम्हणकर पुन्हा ट्रोल

Sai Tamhankar Troll : सई ताम्हणकरला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सईला अनेकांनी "कपडे घाला प्लीझ", "संस्कृती जपा", असे सल्ले दिले आहेत.

Updated: Jan 5, 2024, 04:32 PM IST
'तुला चित्रपटात काम मिळत नाहीत म्हणून...', बोल्ड फोटोशूटमुळे सई ताम्हणकर पुन्हा ट्रोल title=

Sai Tamhankar Troll : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ताम्हणकर ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. सईने फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सई ताम्हणकरला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. 

सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच सईने इन्स्टाग्रामवर एका नव्या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. सईने या फोटोशूटमध्ये पेस्टल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यावर तिने पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातले आहे. सईने हे फोटो पोस्ट करताना वेगवेगळे कॅप्शन दिले आहे. या फोटोत सई ही फारच ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

सईच्या या ग्लॅमरस फोटोशूटमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. सईच्या या फोटोवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. यात एकाने "गरिबांची स्वस्तातील सनी (सई) लियोनी", अशी कमेंट केली आहे. तर एकाने "सई मावशी Western संस्कृती पेक्षा भारतीय संस्कृती भारी", असे म्हटले आहे. 

"तुला movie मध्ये काम मिळत नाही म्हणून अशी फोटो टाकून फेमस होत आहेस का", अशी कमेंट एकाने या पोस्टवर केली आहे. "हे असले फोटो काढले म्हणजे लोक तुम्हांला star समजतील ही खुळी समज करून घेऊ नका सई मॅडम.. जय महाराष्ट्र", असे एकाने कमेंटमध्ये म्हटले आहे. तर काहींनी सईला "कपडे घाला प्लीझ", "संस्कृती जपा", असे सल्लेही दिले आहेत. 

sai tamhankar troll

 

दरम्यान सध्या सई ताम्हणकर ही तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सई ही लवकरच 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर स्क्रीन शेअर करणार आहे. यात सई ही 'श्रीदेवी' हे पात्र साकारत आहे. तर सिद्धार्थाच्या पात्राचे नाव 'प्रसन्न' असे आहे.