Avengers 4 End Game Trailer: धमाकेदार ट्रेलर

पाहा याचा जबरदस्त ट्रेलर 

Avengers 4 End Game Trailer: धमाकेदार ट्रेलर  title=

मुंबई : 'एवेंजर्स 4 एंड गेम'चा ऑफिशिअल ट्रेलर रिलीज झाला आहे. मेकर्सने हा ट्रेलर इंटरनेटवर रिलीज केला आहे. या अगोदरचा सिनेमा 'एवेंजर्स : इनफिनिटी वॉर्स'ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या पार्टचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. प्रेक्षक या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

हा नवा ट्रेलर पाहिल्यावर अंदाज येईल की, मेकर्स या कथेला आणखी थ्रिलर आणि एका वेगळ्या रुपात पुढे घेऊन जात आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अंथोनी रुसो आणि जो रुसो ने केलं आहे. हा सिनेमा एप्रिल 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हॉलिवूडच्या सुप्रसिद्ध मार्व्हल स्टुडिओची बहुचर्चित फिल्म सीरिज ‘अॅव्हेंजर्स’ जगभरातील सिनेप्रेमींची आवडती सीरिज आहे. आत्तापर्यंत आलेल्या या सीरिजच्या प्रत्येक सिनेमाने बॉक्सआॅफिसवर धमाकेदार कमाई केली.