)
Mrunal Dusanis New Look: मराठी टेलिव्हिजनच्या नायिका आज घराघरात लोकप्रिय आहेत. केवळ टेलिव्हिजनच नाही तर टेलिव्हिजनसोबत या नायिकांना हिंदी-मराठी सिनेसृष्टीतही त्यांनी आपलं नावं कमावलं आहे. टेलिव्हिजनच्या सुसंस्कृत नायिका म्हणून त्यांचा संपुर्ण महाराष्ट्रात बोलबोला आहे. त्यामुळे सामान्य प्रेक्षकांपासून ते आत्ताच्या नव्या तरूणाईपर्यंत सगळेच या मालिका एन्जॉय करतात. मुख्य म्हणजे मालिका संपल्या तरी नायिकांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. त्यातीलच एक अभिनेत्री आहे मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis). हे मन बावरे (He Man Baware) या मालिकेनं वर्षभरापुर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यातून या मालिकेतील कलाकारांना निर्माते योग्य वेळी पगार देत नाहीत म्हणून निर्माते-दिग्दर्शक मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) यांच्यावर आरोप-प्रत्यारोपही करण्यात आले होते.
मालिका संपल्यानंतर आता मृणाल काय करते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर मृणाल अमेरिकेला स्थायिक झाली आहे. 24 मार्च 2022 रोजी मृणाल आणि तिचा पती नीरज मोरे (Neeraj More) यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही बातमी तिनं आपल्या चाहत्यासोबत शेअर केली आहे. नुरवी असं तिच्या लेकीचं नावं आहे.
दिवाळीच्या निमित्तानं मृणालनं इन्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यंदाची दिवाळी तिनं अमेरिकेत साजरी केली. नुरवीच्या जन्मानंतर मृणालचा हा एक वेगळा असा लुक पाहायला मिळतो आहे. मृणाल स्टाईलिश शॉर्ट हेअर लुक केला आहे. हा लुक अत्यंत क्लासी आणि ग्लॅमरस आहे. या लुकमध्ये मृणाल अत्यंत सुंदर आणि मॉडर्न वाटते आहे. आपल्या मुली आणि नवऱ्यासह दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोज शेअर केले आहेत. अनेक तिच्या चाहत्यांना तिचा हा नवा लुक पाहून आश्चर्य वाटले आहे. परंतु अनेकांनी तिच्या या नव्या लुकवर कौतुकाचा वर्षावही केला आहे.
मृणालनं माझिया प्रियाला प्रित कळेना (Mazia Priya la Prit Kalena) या मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले होते. ही मालिका बारा-तेरा वर्षांपुर्वी प्रचंड गाजली होती. आजही या मालिकीचे शीर्षकगीत आणि मालिकेची गोष्ट सगळ्यांच्या स्मरणात आहे. माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी (Tu Tithe Mi), अस्स सासर सुरेख बाई, हे मन बावरे या मालिकांमधून मृणालने मुख्य भूमिका बजावल्या आहेत.
मृणालनं पत्रकारितेतून शिक्षण पुर्ण केले आहे परंतु अभिनयाची आवड असल्यानं तिनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. 25 फेब्रुवारी 2016 रोजी नीरज मोरे यांच्याशी मृणालचे लग्न झाले. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला निरज यूएसमध्ये टेक्सास सिटी येथे कार्यरत आहे. आता मृणाल अमेरिकेत स्थायिक झाली आहे. आणि आपल्या मुलीच्या संगोपनात ती व्यस्त आहे.