'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका आता नव्या वेळेत

झी मराठीवर सुरू होणार नवी मालिका 

Updated: Feb 26, 2020, 10:51 AM IST
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका आता नव्या वेळेत

मुंबई : गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.

या मालिकेच्या वेळेत आता बदल होणार आहे. स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस संपणार आहे आणि 'माझा होशील ना' ही नवीन मालिका २ मार्च पासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे ८ वाजता प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको आता नवीन वेळी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका २ मार्च पासून नवीन रूपात सोमवर ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.

सध्या या मालिकेत गुरुनाथ मायाचा वापर करून एस. बी. कंपनीत स्वतःच स्थान अढळ करण्याचा प्रयत्न करतोय. राधिकाची एस. बी. कंपनीच्या सी.इ.ओ. पदी निवड झाली असून गुरुनाथ आणि तिचा या कंपनीत आमना-सामना झाल्यावर काय नवीन प्रॉब्लेम्स गुरु राधिकासाठी निर्माण करणार हे प्रेक्षक आगामी भागात पाहू शकतील. या मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत जरी बदल झाला असला तरी प्रेक्षकांचं प्रेम आणि त्यांचा भरगोस प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही.