शंकर महादेवन यांना वासुदेवाची भुरळ

कलेची कदर करणारी व्यक्ती 

Updated: Feb 26, 2020, 10:19 AM IST
शंकर महादेवन यांना वासुदेवाची भुरळ

मुंबई : सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या आवाजाचे तर आपण सगळेच चाहते आहेत. आतापर्य्ंत अनेक गाण्यांमधून त्यांनी प्रेक्षकांना भरभरून आनंद दिलाय. पण दस्तुरखुद्द शंकर महादेवन यांना का आवाजाने भुरळ घातली आहे. हा व्हिडिओ स्वतः शंकर महादेवन यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

शंकर महादेवन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्या बिल्डिंगखाली आलेल्या वासुदेवाचा व्हिडिओ आहे. शंकर महादेवन यांनी या वासुदेवांच्या गाण्याचं भरभरून कौतुक केलं आहे. 

Talent Unlimited ... म्हणतं हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. ही व्यक्ती अनवाणी पायाने संगितातील आनंद सगळीकडे पसरवत आहे. बिल्डींगखाली यांचा आवाज ऐकला... म्हटलं यांची कला तुमच्यापर्यंत पोहोचवावी... अशी पोस्ट शंकर महादेवन यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

शंकर महादेवन यांच्या ब्रेथलेस गाण्याचे आजही अनेकजण फॅन आहेत. बॉलिवूड तसेच अन्य भाषांमध्ये त्यांचा असलेला वावर हा खरंच कौतुकास्पद आहे. शंकर महादेवन यांनी कायमच कलेचं कौतुक केलं. आतापर्यंत त्यांनी अनेकदा असे व्हिडिओ शेअर केले आहेत.