'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये अव्वल

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको टीआरपीमध्ये अव्वल स्थानी आहे. 

Updated: Jun 22, 2017, 11:03 PM IST
'माझ्या नवऱ्याची बायको' टीआरपीमध्ये अव्वल title=

मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको टीआरपीमध्ये अव्वल स्थानी आहे. 

घरात राधिका आणि घराबाहेर शनाया यांना एकाचवेळेस सांभाळताना होत असलेली गुरुनाथची कसरत यामुळे मालिकेत चांगलीच रंगत आलीये. त्यामुळे या मालिकेला चांगला टीआरपी मिळतोय.

टीआरपीमध्ये दुसऱ्या स्थानावर तुझ्यात जीव रंगला ही मालिका आहे. तिसऱ्या स्थानावर चला हवा येऊ द्या भारत दौरा तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे काहे दिया परदेस आणि चूक भूल द्यावी घ्यावी या मालिका आहेत. 

काही दिवसांपूर्वी सुरु झालेली लागिरं झालं जी या मालिकेला मात्र अव्वल ५मध्ये स्थान मिळालेलं नाहीये.