अभिनेता चिरंजीवी सरजाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

चिरंजीवी सरजाच्या कुटुंबीयांनी ही गोड बातमी दिली.    

Updated: Oct 23, 2020, 11:39 AM IST
अभिनेता चिरंजीवी सरजाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

नवी दिल्ली : आयुष्यात असे काही क्षण येतात ज्या क्षणांचा विचार आपण स्वप्नातही करत नाही. अभिनेता  चिरंजीवी सारजा यांच्या मृत्यूनंतर त्याच्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज असलेल्या पत्नी मेघना सरजाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. चिरंजीवी सरजाच्या कुटुंबीयांनी ही गोड बातमी दिली. चिरंजीवीचा चुलत भाऊ सुरजने सोशल मीडियावर या लहान बाळाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये चिरंजीवीच्या फोटोसमोर चिमुकल्याला घवून हा फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Junior chiru is comming 

A post shared by DS_BOSS (@_action_prince_fc) on

काही दिवसांपूर्वी मेघना सरजाच्या  डोहाळे जेवणाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. baby shower च्या दिवशी एका सिंहासनावर बसलेल्या मेघनाच्या मागे चिरंजीवी दिसून आला होता. अर्थात तो त्यांचा फोटो असल्याचं पुढं लक्षात येत आहे. 

चिरंजीवी आणि मेघनाचं नातं होतं खास... 
लग्नापूर्वी जवळपास १० वर्षांपासून ते एकमेकांचे चांगले मित्र होते. काही दिवसांनी त्यांच्या प्रेमाचे  रूपांतर प्रेमात झालं आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.  चिरंजीवी आणि मेघना राज यांनी २०१८ मध्ये लग्न केलं होतं.