प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा हा फोटो वायरल, तुम्ही पाहीला का ?

प्रियंका-निकचा फोटो व्हायरल

Updated: Oct 22, 2020, 11:29 PM IST
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा हा फोटो वायरल, तुम्ही पाहीला का ?

नवी दिल्ली : देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि इंटरनॅशनल सिंगर निक जोनास यांची सोशल मीडिया फॉलोइंग खूप मोठी आहे. हे दोघे नियमित कपल्स फोटो टाकत असतात आणि आपल्या खासगी आयुष्यातील क्षण चाहत्यांसमोर आणत असतात. निक जोनासने हल्लीच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. जो मिनिटभरात वायरल झाला.  

निकने आपला मित्र ग्लेन पॉवेलला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रियंका आणि निक एक पॅशनेट लिपलॉक करताना दिसतायत. निकने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकला आणि बघता बघता तो वायरल देखील झाला. 

या कपल्सने २ डिसेंबर २०१८ ला जोधपूरच्या उम्मेद पॅलसमध्ये लग्न केलं. त्यांचा लग्नसमारंभ खूप दिवस चालला. या जोड्याने ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने रिवाज पार पाडले. 

यानंतर ४ डिसेंबरला दिल्लीमध्ये व्हीव्हीआयपी, मीडिया आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन ठेवलं होतं.