नवी दिल्ली : अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे गायक मिका सिंगदेखली अभिनेता सलमान खानच्या बाजूने उभा राहिला आहे. १९९८ मध्ये केलेल्या काळवीट हत्येप्रकरणी दोषी ठरवत सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. सलमान खानच्या फेसबुक फॅन पेजवर शोककळा पसरली आहे. काही फॅन्स न्यायालय आणि न्यायाधिशांना नावं ठेवत आहेत. काहींनी तर थेट मोदींनाच यामध्ये खेचल आहे. सर्वजण सलमानसाठी प्रार्थना करत आहेत. सलमानच्या काही फॅन्सना तर एवढ दु:ख झालयं मिका सिंगने देखील एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये काही लोक मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण करत आहेत. यासोबतच मिकाने पोस्टही लिहिली. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण कायदा सर्वांसाठी सारखा असायला हवा. सलमानला सेलिब्रेटी असूनही तुरूंगवास होऊ शकतो तर एका दुर्बलाला मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांनादेखील कठोर शासन व्हायला हवं. पण ते त्यांना काही झाल नाही कारण ते सलमान खान नाहीत.
I respect Our Legal System but Law should be same for all if @beingsalmankhan can be convicted though he is celebrity then such people who r assaulting a poor guy and making a video of their criminal act should also be punished.. They r safe cuz they r not @BeingSalmanKhan .. pic.twitter.com/1ikLMNtzAO
— King Mika Singh (@MikaSingh) April 6, 2018
सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहिण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते, पण एकूणच सलमान खानला मोठा दिलासा आहे.
दरम्यान, सैफअली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आज सकाळी न्यायालयात पोहोचल्यावर सलमान खानने न्यायालयरूममध्ये न्यायाधीशांसमोर उभे राहून निर्दोष असल्याचे म्हटले. आरोपींपैकी सर्वात आधी सलमान खान न्यायालयात पोहोचला होता.
१९९९ साली हम साथ साथ है चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना काळविटाची शिकार करण्यात आली होती.
मागील वेळेस जेव्हा सलमान खानला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा त्याला बरॅक नंबर १ मध्ये ठेवण्यात आले. तेथे सलमान पाच दिवस होता. तेव्हा त्याचा कैदी क्रमांक ३४३ होता.
खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावूक झाला होता.