व्हिडिओ : 25 वर्षे लहान बायकोला उचलून मिलिंद सोमणच्या बैठका

 दोघांच्या वयामध्ये खूप अंतर असण्या बाबतीत लोकांना जास्त स्वारस्य आहे. 

Updated: Nov 30, 2018, 01:59 PM IST
व्हिडिओ : 25 वर्षे लहान बायकोला उचलून मिलिंद सोमणच्या बैठका title=

मुंबई : मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर या दाम्पत्याचा नवा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत मिलिंद सोमण आपली पत्नी अंकिताला उचलून बैठका मारताना दिसतोय. हे दृश्य पाहणारी मंडळी टाळ्या आणि शिट्ट्यांनी दोघांना दाद देताना दिसत आहेत. या दोघांनी 22 एप्रिलला अलिबागमध्ये जाऊन लग्न केलं. दोघांच्या लग्नाची सगळीकडे चांगलीच चर्चा झाली. हे दोघेही मॅरेथॉन रनर आहेत पण याही पेक्षा दोघांच्या वयामध्ये खूप अंतर असण्या बाबतीत लोकांना जास्त स्वारस्य आहे. 

सुपर मॉडेल मिलिंद सोमण हा तरुणीमध्ये सर्वाधिक पसंतीस आहे. गेल्यावर्षी त्याने आपला 52 वा वाढदिवस साजरा केला. लवकरच तो 'इंडियाज नेक्स्ट सुपरमॉडेल' मध्ये जज म्हणून दिसणार आहे.

Image result for milind soman zee news

'फरक पडत नाही'

अलिबागमध्ये लग्न केल्यानंतर १२ जुलैला स्पेनमध्ये दोघांनी बेअरफूड वेडींग केले. पत्नी आणि आपल्या वयातील अंतराबद्दल मिलिंद म्हणाला की, यामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. वय आमच्यासाठी महत्त्वाचे नाही आहे.

मिलिंद सोमणने शेयर केलाय हनीमुनचा फोटो

दिल्लीत राहणा-या अंकिताने एअर एशिया एअरलाईन्समध्ये केबिन क्रू म्हणून कामाला सुरूवात केली होती.

Image result for milind soman and ankita konwar zee news

हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, बंगाली अशा विविध भाषांवर प्रभूत्व असलेली अंकिता मॅरेथॉनदरम्यानच मिलींद सोमणच्या प्रेमात पडली. २०१५ मध्ये अंकिताने मिलींदसोबत मॅरेथॉनचा टप्पाही पूर्ण केला होता.

खरंतर मिलींद सोमणचं हे दुसरं लग्न. याआधी जुलै २००६ मध्ये फ्रेंच अॅक्ट्रेस मायलेनशी मिलिंदने लग्नाची गाठ बांधली होती.

Image result for milind soman zee news

मात्र ती फार काळ काही टिकली नाही.  माजी मिस इंडिया आणि मॉडेल मधू सप्रेसोबतच्या अफेअरमुळेही मिलींद सोमण चर्चेत होता.