मिलिंद सोमनला कोरोनाची लागण, ट्विट करून दिली 'ही' माहिती

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाटत आहे.

Updated: Mar 26, 2021, 09:38 AM IST
मिलिंद सोमनला कोरोनाची लागण, ट्विट करून दिली 'ही' माहिती

मुंबई : मध्यंतरी कोरोना रूग्णांचा आकडा मंदावला होता. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाटत आहे. राज्यात  कोरोना रूग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा  देखील सतर्क झाली आहे. तर दुसरीकडे नियम कठोर करण्यात आले आहेत. काही दिवसांपसून अनेक कलाकारांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर येत होती. अशात प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमनला देखील कोरोना झाल्याचं समजतं आहे. खुद्द मिलिंदने कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. 

ट्विट करत मिलिंद म्हणला, 'कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे  स्वतःला घरात क्वारंटाईन करून घेतलं आहे.' मिलिंदला कोरोना झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मिलिंद लवकरात-लवकर कोरोनाच्या विळख्यातून सुटण्याची प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत. 

त्याच्या या ट्विटवर एका युझरने लवकर नेगेटिव्ह हो... अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर  तुझी फिटनेस तुला फिट ठेवेल असं देखील त्याचे चाहते म्हणतं आहेत. मिलिंदचे हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे. मिलिंद कायम पत्नी अंकितासोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना देखील कपल गोल देत असतो. तर त्याच्या काही फोटोंमुळे तो ट्रोल देखील होतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फोर मोठी आहे.