मुंबई : मॉडेल मिलिंद सोमन सध्या त्याच्या एका पोस्टमुळे कमालीचा चर्चेत आला आहे. मिलिंद सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टीव्ह असतो. त्याच्या प्रोजेक्ट संदर्भातील अपडेट्स तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत असते.
मिलिंदने नुकतेच शेअर केलेल्या फोटोत त्याने तृतीयपंथीचं रुप घेतलं आहे. एका वेबसाईटसाठी त्याने ट्रांसजेंडरची भूमिका साकारली होती.
या भूमिकासाठी त्याचं विशेष कौतुक झालं होतं, आता फिल्मफेअरमध्ये त्याला या पात्रासाठी नॉमिनेशन मिळालं आहे.
55 वर्षीय मॉडेलवर अनेक मुली फिदा आहेत. पण जेव्हा मिलिंदनेच हे रुप घेतलं तेव्हा अनेकांना धक्का बनला होता. कपाळावर टिकली आणि अंगावर अलंकार , लांब मोकळे केस असा लूक मिलिंदने केला होता.
आता पुन्हा त्याने फोटो शेअर केल्याने या लुकची पुन्हा एकदा चर्चा सुरु होत आहे.