मिलिंद सोमणच्या आईचा सुनेसोबत लंगडीचा डाव

'वयाच्या कोणत्याही टप्प्यात फिट असायला हवं...'

Updated: Apr 4, 2020, 03:23 PM IST
मिलिंद सोमणच्या आईचा सुनेसोबत लंगडीचा डाव title=

मुंबई : 'वयाच्या कोणत्याही टप्प्यात फिट असायला हवं...'  असा मोलाचा संदेश  प्रसिद्ध मॅडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण काय त्याच्या चाहत्यांना दित असतो. फिटनेस टिप्स आणि मॅरेथॉनमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. शिवाय सोशल मीडियावर देखील तो कायम फिटनेस संदर्भात अनेक गोष्टी पोस्ट करत असतो. नुकताच पोस्ट केलाला आईचा आणि पत्नीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्याची पत्नी अंकिता व आई उषा सोमण हे लंगडी खेळताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे आयुष्यात फिटनेसचं महत्त्व काय आहे? हे या दोघी पटवून देताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

28 and 81 ! Be fit at every age #mygirls @ankita_earthy @somanusha . . . #betterhabits4betterlife #Live2Inspire #fitnessaddict #keepmoving #neverstop #nevergiveup . . . Who run the world ???!!

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

मिलिंद सोमनच्या आईचे वय ८१ वर्ष तर त्याच्या पत्नीचे वय २८ वर्ष आहे. पण या व्हिडिओमध्ये दोघींमधील उत्साह आणि त्याच्यातील ऊर्जा सारखीच दिसून येत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मिलिंदने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

भारताचा 'आयर्न मॅन', 'मिस्टर फिटनेस' अशी ओळख असणाऱ्या अभिनेता मिलिंद सोमण Milind Soman याची अनेक रुपं चाहत्यांच्या मनाचा विशेष ठाव घेणारी. त्याच्या चाहत्यांध्ये महिलांची संख्या तुलनेने जास्त. असं असलं तरीही पुरुषांसाठीसुद्धा तो अनेकदा मैलाचे दगड प्रस्थापित करुन गेला आहे.