रणवीर सिंगच्या 'न्यूड फोटोशूट' प्रकरणात महिला खासदारांची एन्ट्री, म्हणाल्या...

'मुलीने केलं असतं तर तिच्या घरी...', महिला खासदारांचा रणवीर सिंगच्या 'न्यूड फोटोशूट'ला कडाडून विरोध   

Updated: Jul 23, 2022, 09:49 AM IST
रणवीर सिंगच्या 'न्यूड फोटोशूट' प्रकरणात महिला खासदारांची एन्ट्री, म्हणाल्या...  title=

मुंबई : अभिनेता रणबीर सिंगच्या न्यूड फोटोशूटची सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहे. त्याच्या न्यूड फोटोशूटवर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याच्या न्यूड फोटोमुळे खळबळ माजली आहे. कायम विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असणाऱ्या रणवीरने  न्यूड फोटोशूट केल्यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता टीएमसीच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी रणवीरच्या फोटोशूटवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

मिमी चक्रवर्ती ट्विट करत म्हणाल्या, 'रणवीर सिंगच्या नवीन फोटोशूटने इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. यावर प्रतिक्रिया देणारे बहुतेक लोक फक्त फायर इमोजी शेअर करत आहेत. मी विचार करत होती की, जर ती मुलगी असती तर लोकांनी तिची अशी स्तुती केली असती का?' असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. 

शिवाय त्या पुढे म्हणाल्या, 'जर एखाद्या मुलीने असं केलं असतं तर, तिचं घर जाळलं असतं किंवा तिला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असत्या..' असं म्हणत मिमी चक्रवर्ती रणवीरच्या न्यूड फोटोशूटला कडाडून विरोध केला. 
 

न्यूड फोटोशूटनंतर काय म्हणाला रणवीर?

''मी लोकांची पर्वा करत नाही. मी काय घालावं आणि काय घालू नये हे मी ठरवणार. लोकांचं काम फक्त बोलणं आहे. मला त्याची पर्वा नाही. एवढच नव्हेतर मी 1000 लोकांच्या समोर असं फोटोशूट करु शकतो''. असं रणबीर एका  मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.