शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतची ऑनलाईन फसवणूक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला ऑनलाइन शॉपिंग करणं महागात पडलं आहे

Updated: Jul 9, 2021, 08:03 PM IST
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतची ऑनलाईन फसवणूक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुंबई : शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला ऑनलाइन शॉपिंग करणं महागात पडलं आहे. यामुळे मिरा फसवणूकीचा बळी ठरली आहे. ही फसवणूक फार मोठी नाहीये, ज्यामुळे मिराला पोलिसांत तक्रार करावी लागेल, म्हणूनच तिनी तिच्या सोशल मीडियावर याबद्दलची माहिती शेअर केली आहे. मीराने फोनचं कव्हर ऑनलाईन खरेदी केलं होते पण जे कव्हर तिच्यापर्यंत पोहचलं ते कव्हर खूप खराब आहे. फोन कव्हरचा एक फोटो तिने तिच्या इंस्टस्टोरीमध्ये शेअर केला. 

मीरा राजपूतने लिहिलंय की, ''मला एक स्लिंग कव्हर हवं होतं जे मला वर्कआउट किंवा फिरायला जाताना खूप उपयोगी पडलं असतं. मला बॅग घेऊन जायची गरज पडणार नाही. मी एका जाहिरातीमुळे फसले आणि एक फोन कव्हर विकत घेतलं ज्या प्रमाणे हे कव्हर फोटोत दिसत होतं त्याप्रमाणे ते रिअलमध्ये दिसत नाही हे कव्हर प्लास्टिकचं आहे, माझी अशा प्रकारची फसवणून व्हायला बराच काळ झाला,'' असे मीरा म्हणाली.

 तर दुसरा फोटो शेअर करत मिरा म्हणाली, ऑनलाईन शॉपिंग करणं फारच असुरक्षित आहे.

शाहिद मीराच्या लग्नाला झाली 6 वर्ष पूर्ण
नुकताच मिरा आणि शाहिदचा लग्नाचा वाढदिवस पार पडला. या दोघांच्या लग्नाला 6 वर्ष पुर्ण झाली. एक फोटो शेअर करत मीराने लिहिलं, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा'' मीरा आणि शाहिद केवळ चांगले पालकच नाहीत तर परफेक्ट कपल देखील आहेत. मीरासारखी बायको मिळाल्याने शाहिद स्वत: ला खूप भाग्यवान मानतो असं शाहिद बर्‍याचदा सांगतो. त्याचबरोबर मीराही स्वत:ला खूप भाग्यवान मानते. दोघांनाही मीशा आणि झेन ही दोन मुलं आहेत