मिशाच्या फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना मीराचं प्रत्युत्तर

ट्रोलर्सला महत्त्व देत नसल्याचं मीराने सांगितलंय.

Updated: Feb 14, 2019, 11:54 AM IST
मिशाच्या फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना मीराचं प्रत्युत्तर

मुंबई : बॉलिवूड अभिनेचा शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. मीराने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवरून एक स्टोरी पोस्ट केली होती. दोन वर्षांच्या मिशाने तिच्या केसांना कलर केल्याची स्टोरी 'टेंम्पररी' असं लिहून पोस्ट केली होती. या पोस्टवर नेटकऱ्यांनी मीराला ट्रोल केलं आहे. त्या पोस्टवर मीराला अत्यंत वाईट प्रतिक्रियाही आल्या. 

याबाबात मीराला विचारलं असता तिने सांगितलं की, 'मिशाने लावलेला कलर हा केसांना लावायचा कलर नव्हता. तो साधा रंग होता. मिशा तिच्या या रंग कामात चांगला वेळ घालवत होती. मला असं वाटतं की, तुम्ही तुमच्या मुलांना क्रिएटिव्ह होण्यापासून थांबवू नका. त्यांना मुक्त राहू द्या. त्यांना खेळण्यासाठी चांगला वेळ द्या. ही बाब गंभीरतेने घेण्यासारखी नाही' असं तिनं सांगितलंय. 
 

गेल्या काही दिवसांपूर्वीही मीराला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. मीराने केलेल्या एका एन्टी-एजिंग क्रिमच्या जाहीरातीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. करिना कपूरला कॉपी न करण्यावरूनही तिच्यावर टीका करण्यात आली होती. 

या ट्रोलिंगबद्दल मीराला विचारलं असता तिने अशा ट्रोलर्सला मी महत्त्व देत नसल्यचं तिने म्हटलंय.