मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'बाईपण भारी देवा' सिनेमाची भुरळ; पुरुषांसाठी दिला खास संदेश

'बाईपण भारी देवा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळ-जवळ दीड महिना झाला आहे. मात्र आजही प्रेक्षक या सिनेमावर तितकच प्रेम करत आहेत. 

Updated: Aug 10, 2023, 06:13 PM IST
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'बाईपण भारी देवा' सिनेमाची भुरळ; पुरुषांसाठी दिला खास संदेश title=

मुंबई : 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सत्ता गाजवत आहेच परंतु आता प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वांनीही ह्या चित्रपटाचे भरभरुन कौतुक केलेले आपण पाहिले. तसच मुंबई पोलिसही चित्रपट पाहून भारावून गेले होते. 30 जूनला हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळ-जवळ दीड महिना झाला आहे. मात्र आजही प्रेक्षक या सिनेमावर तितकच प्रेम करत आहेत. 

आणि आज माननीय श्री. राज ठाकरे यांनीही चित्रपट पाहिल्यावर आपलं मत एका व्हिडिओद्वारे व्यक्त केलं आहे. मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे म्हणाले कि,स्त्रिया चित्रपट बघतच आहेत परंतु पुरुषांनीही पहावा असा हा सिनेमा आहे. आपल्या माता, भगिनी कोणत्या कोणत्या परिस्थितीतून जातात ते समजण्याची ही गरज आहे. चित्रपट पाहिल्यावर महिला स्वतःला रिलेट तर करतातच, परंतू पुरुषांनीही आपल्या रोजच्या जीवनात जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या काढून टाकणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बाईपणच्या कथानकाचं खरं यश हे आहे''

जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओजनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे आहेत. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट कथानक, सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटाने, इतर अनेक चित्रपटांना मागे टाकत, आपला जोरदार ठसा उमटवला आहे हे नक्की!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा सध्या उंचीच्या शिखरावर आहे. सिनेमा रिलीज होवून जवळपास दीड महिना झालाय मात्र या सिनेमावर प्रेक्षक आजही तितकंच प्रेम करत आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. असं असताना या सिनेमातील कलारांवरही प्रेक्षक तितकंच प्रेम करताना दिसत आहेत.

या चित्रपटानं सध्या पुरता धुमाकूळ घातला आहे. महिलावर्गात तर या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. गेल्या महिन्याभरापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे सोबतच या चित्रपटाला फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे. महिलावर्गानंही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यातून काहींनी तर हा सिनेमा चार नाही तर पाच वेळा तरी पाहिला असेल इतका हा चित्रपट महिलावर्गालाही आवडला आहे. सोबतच या चित्रपटाला पुरूषवर्गाचाही तूफान प्रतिसादही लाभला आहे. तरूणवर्गही आवर्जून या चित्रपटाला हजेरी लावतो आहे.