3 कोटींचा हुंडा की घटस्फोट? या मॉडेलनं काय घेतला निर्णय

पुरुषांच्या फसवणूकीला कंटाळून  मॉडेलने केलं स्वतःशीच लग्न

Updated: Sep 24, 2021, 10:13 PM IST
3 कोटींचा हुंडा की घटस्फोट? या मॉडेलनं काय घेतला निर्णय

मुंबई : पुरुषांच्या फसवणूकीला कंटाळून, ब्राझीलच्या मॉडेल क्रिस गॅलेरने स्वतःशीच लग्न केलं आहे. तिच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं आहे, . तिच्या एका मुलाखतीत, मॉडेलने खुलासा केला आहे की, अरेबियातील एका शेखला तिच्याशी लग्न करायचं आहे. यासाठी, शेखने $ 500,000 म्हणजेच सुमारे 3 कोटी रुपयांची ऑफर देखील दिली आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
33 वर्षीय मॉडेलचं काही काळापूर्वी तिच्या प्रियकरासोबत ब्रेकअप झालं. त्यानंतर ती एकटी राहू लागली. यानंतर मॉडेलला वाटू लागलं की, तिला आनंदी राहण्यासाठी जोडीदाराची गरज नाही. अनेक नात्यांमध्ये फसवलं गेल्यानंतर तिने स्वतःची काळजी घेतली आणि तिने ठरवलं की, ती स्वतःशी लग्न करेल कारण तिला इतर कोणाची गरज नाही, ती एकटीच खूष आहे. 

यानंतर, क्रिसने चर्चमध्ये जाऊन स्वतःशीच लग्न केलं. एका मॉडेलने स्वतःशीच लग्न केल्याची बातमी नवीन होती. लग्नात परिधान केलेले कपड्यांमधील मॉडेलचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. पण अरेबियाच्या एका शेखने हे फोटो पाहिल्यावर त्याने ख्रिसला प्रपोज केलं.

घटस्फोट घे आणि माझ्याशी लग्न कर
मॉडेल ख्रिसने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'जेव्हा माझ्या लग्नाची बातमी व्हायरल झाली तेव्हा माझ्या इन्स्टाग्रामवर अशा अनेक मुलांचे मॅसेज आले आहेत जे माझ्याशी लग्न करू इच्छितात. यातील एक मॅसेज अरेबियाच्या शेखचा होता. मी स्वतःला घटस्फोट देऊन त्याच्याशी लग्न करावं अशी त्याची इच्छा आहे. त्याबदल्यात त्याने 3 कोटींचा हुंडा देण्याविषयीही सांगितलं. 

ती पुढे म्हणाली, 'हा एक अनोखा प्रस्ताव होता, ज्याला मॉडेलने उत्तर देण्यापूर्वी खूप विचार केला. आणि नंतर प्रतिसादात मॉडेलने शेखला लिहिलं,' मला कोणी विकत घेवू शकत नाही. मी तुला ओळखतही नाही. मी फक्त पैशासाठी लग्न करणार नाही. मॉडेलने सांगितलं की तिने सगळे प्रस्ताव नाकारले.