मुंबई : अभिनेत्री मोनिका डोगराने तिच्या लैंगिकतेबाबत मोठा खुलासा केला आहे. मोनिकाने सांगितलं आहे की, ती पॅनसेक्सुअल आहे. एक काळ असा होता जेव्हा तिला तिच्या लैंगिकतेची लाज वाटायची. मोनिकाने तिच्या गुप्त लग्नाबाबतही सांगितलं आहे. जाणून घेवूयात मोनिकाचे धक्कादायक खुलासे.
एका मुलाखतीत बोलताना मोनिकाने सांगितलं की, जेव्हा तिला तिच्या पॅनसेक्स्युएलिटीबद्दल माहिती मिळाली. तेव्हा मोनिकाने सांगितलं की, तिने हा शब्द ५-६ वर्षांपूर्वी ऐकला होता. आणि जेव्हा तिला pansexuality बद्दल माहिती मिळाली. तेव्हा तिला समजलं की ती पॅनसेक्सुअल आहे.
ती म्हणाली, मी काही दिवस टॉमबॉय टाईप होते. मग काही दिवस हायपरफेमिनाइन. तिला दोन्ही बाजूंनी व्यक्त व्हायला आवडायचं. मी कॉलेजमध्ये असेपर्यंत मी कोणत्याही मुलीला कीस केलं नाही किंवा मला लैंगिक अनुभवही आला नाही. तोपर्यंत मी स्वतःला सरळ समजत होते.
या अनुभवानंतर मी कोण आहे हे मला समजलं. मला वाटायचं की कदाचित मी उभयलिंगी आहे. तोपर्यंत मला pansexuality चा अर्थ माहित नव्हता. पण मला माहीत होतं की मला स्त्रीलिंगी आणि मर्दानी ऊर्जा आवडते. मग लवकरच मोनिकाला पॅनसेक्स्युएलिटीबद्दल माहिती मिळाली आणि ती त्यात फिट झाली. गेल्या वर्षीच मोनिका डोग्राला तिची ओळख कळली.
मोनिकाने सांगितलं की, मोठं झाल्यावर मला बहुतेकवेळा माझ्या लैंगिकतेबद्दल लाज वाटते. मला आठवतं जेव्हा माझं स्तन पहिल्यांदा दिसायला लागलं तेव्हा मला वाटलं माझं आयुष्य संपलं आहे. माझं स्वातंत्र्य संपलं आहे मी एक स्त्री होत आहे.
भारतात माझे चुलत भाऊ माझा विनयभंग करायचे. माझा कौटुंबिक मित्र झोपेत चुकीच्या ठिकाणी मला स्पर्श करायचा. माझ्या कलेतून मी माझं सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही माझं म्युझिक व्हिडीओ पाहिल्यास, त्यांचे बोल ऐका, तर मी माझी अवस्था खूप दिवसांपासून सांगत आहे.
मोनिकाने तिच्या गुप्त लग्नाबद्दलही सांगितलं. ती म्हणली, माझं लग्न एका पुरुषाशी झालं होतं. मला त्याला सांगायचं होतं की मला माझ्या सहकलाकारांचं आकर्षण वाटतं. त्याने माझा हात हातात घेतला आणि मला समजून घेतलं. हे बघून मी आणखीनच त्याच्या प्रेमात पडले. आम्ही आमचे रस्ते वेगळे केले आणि आमचं लग्न तुटलं. मी माझं लग्न प्रेसपासून गुप्त ठेवलं.