मदर्स डे स्पशेल : या कलाकारांनी शेअर केल्या आठवणी

मराठी कलाकारांनी शेअर केल्या आठवणी 

मदर्स डे स्पशेल : या कलाकारांनी शेअर केल्या आठवणी  title=

मुंबई : मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी म्हणजे 13 मे रोजी मदर्स डे हा जगभरात साजरा केला आहे. प्रत्येकाच्या जीवनात आईचं महत्व हे अनन्य साधारण आहे. आई हा प्रत्येकासाठीच पहिला देव आहे. त्यामुळे हा दिवस प्रत्येकजण आठवणीने साजरा करतो. आपल्या आईबद्दल प्रत्येकाच्या मनात कृतज्ञता आहे. अशीच कृतज्ञता मराठी कलाकारांनी देखील व्यक्त केली आहे. कामाच्या निमित्ताने हे कलाकार आपल्या कुटुंबियांपासून दूर असतात. त्यामुळे यांना आईची आठवण जरा अधिक येत असते. त्यामुळे या मराठी कलाकारांनी आपल्या आईसोबतच्या आठवणी शेअर केल्या. 

सुयश टिळक, अभिनेता (बापमाणूस - झी युवा)

माझी आई माझ्या जवळची मैत्रीण आहे. मला काही कमी पडू नये त्यासाठी ती दिवसाचे २४ तास कष्ट करते. मी लहान होतो तेव्हा पासून ती स्वतः सिलेब्रिटी असून घर आणि काम याचा उत्तम बॅलन्स कसा साधायचा हे तिच्याकडूनशकत आलो आहे. तिचं भरतनाट्यमची एक मोठी गुरु असणं आमच्या आई मुलाच्या नात्यामध्ये कधीच डोकावलं नाही. आज मी जे काही आहे ते माझ्या आई आणि बाबांमुळे आहे.

अश्विनी कासार, अभिनेत्री (कट्टी बट्टी - झी युवा)

माझ्या आईला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आणि तिकडच्या फेमस डिशेस, लोकल फूड खायला खूप आवडतं. मला वाटतं की मला पण ही आवड तिच्यामुळे निर्माण झाली. तिच्यामुळेच मला गाणी ऐकण्याची, कविता करण्याची, आपले विचार लेखणीतून मांडण्याची गोडी लागली. आई ही एकच अशी व्यक्ती असते जी तुम्हाला कुठल्याही अपेक्षेशिवाय किंवा अटीशिवाय प्रेम करते. आपण तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून कृतज्ञता व्यक्त केली, तिचीकाळजी घेतली तरीही ती खुश होते. सगळ्या आईंना मी मातृदिनाच्या शुभेच्छा देते.

फुलवा खामकर, कोरिओग्राफर  (परीक्षक: डान्स महाराष्ट्र डान्स - झी युवा)

माझ्या आईकडून मला डान्सची आवड निर्माण झाली. मी माझ्या आईकडून खूप काही शिकले. मी स्वतः एक आई आहे त्यामुळे आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करणं ही किती मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. मीसर्व आईंना हाच एक संदेश देऊ इच्छिते की तुमच्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअर बनवण्याआधी एक सुजाण आणि चांगलं माणूस बनवा.

संकर्षण कऱ्हाडे (देवाशप्पथ - झी युवा)  

माझी आई म्हणजे; सकारात्मकता, संयम, सात्विकपणा आणि अप्रतिम स्वयंपाक ह्या सग्गळ्याचा साठा आहे. व्हाॅट्स ॲप च्या जोक शेअर करण्यापासुन ते योग्य भाषेत कान टोचण्यापर्यंत.. आणि कामातल्या कौतुकापासुन ते संसारातल्या हितगुजापर्यंत सग्गळ्या गोष्टींवर ती माझ्याशी बोलु शकते.. माझ्या बाबांची ३७ वर्षांची बॅंकेतली यशस्वि नोकरी, ३ भावंडांचं योग्य संगोपन आणि करीयर हे तिच्याच निस्वार्थी कष्टाचं फलीत आहे. जगण्याची हि दृष्टी तिने नक्कीच तिच्या आई कडनं घेतली.. आणि ताई पर्यंत अजुन प्रभावीपणे पोचवलीये.. तिला नमस्कारच नाहि.. सष्टांग दंडवत आहे..