स्टंटमनचं वयवर्ष 66 , 500 हून जास्त चित्रपट; पण अपघातात शरीरावरील सगळे केस जळाले अन्...

Motta Rajendran: कलाकारांसाठी काहीच सोप्पं नाही त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येकवेळी एक नवीन टास्क असतो आणि तोही काही सोप्पा नाही. या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याची गोष्ट सांगणार आहोत. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 10, 2023, 01:19 PM IST
स्टंटमनचं वयवर्ष 66 , 500 हून जास्त चित्रपट; पण अपघातात शरीरावरील सगळे केस जळाले अन्... title=
June 10, 2023 | Motta Rajendran struggle story as he faced a major accident his life lost his hair on the body (Photo: @thirdeyecinemas | Twitter)

Motta Rajendran: दाक्षिणात्त्य चित्रपट हे आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत येतात. त्यांचे फॅन फॉलोईंग हे प्रचंड आहे. त्यामुळे या चित्रपटातील कलाकारांचेही फॅन फॉलोईंग प्रचंड असते. आज पुष्पासारखा चित्रपट हा जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहिला जातो आणि त्यासोबत अल्लू अर्जुनचे जगाच्या कानाकोपऱ्यात फॅन्स असतात. त्यामुळे सगळीकडेच फक्त त्यांचीच चर्चा असते. परंतु कलाकार होणं सोप्पं नाही आणि खायची गोष्ट मुळीच नाही. त्यामुळे कलाकारांच्या अभिनयाची त्यांच्या मेहनतीची सगळीकडूनच प्रसंशा केली जाते. या चित्रपटसृष्टीत फक्त अभिनेतेच नाहीत तर अनेक प्रकारचे कलाकार असतात. उदाहरणार्थ स्टंटमन किंवा बॉडी डबल. अशा कलाकारांचेही रोजगार या चित्रपटसृष्टीत चालतात 

परंतु स्टंटमन म्हणून काम पाहणं एका अभिनेत्याला चांगलंच महागात पडलं आहे. वय 66 आणि आपल्या करिअरमध्ये या कलाकारानं 500 हून अधिक चित्रपट केले आहेत. त्यामुळे या कलाकाराची लोकप्रियता किती असेल हे आपण समजूच शकतो परंतु त्यातूनही स्टंटमन होणं हे काही सोप्पं काम नाही त्यासाठी कलाकारांनाही त्याप्रमाणे ट्रेन करणं गरजेचे असते आणि त्यांना ट्रेन होणंही गरजेचे असते. अशाच चर्चा आहे ती म्हणजे दाक्षिणात्त्य चित्रपट अभिनेते मोट्टा राजेंद्रन यांची. एकेकाळी या अभिनेत्याची खूपच क्रेझ होती. परंतु त्यांचा एक भीषण अपघात झाला आणि त्यांचे आयुष्यच बरबाद झाले. 

समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, एका स्टंटदरम्यान त्याचा एक अपघात झाला होता. त्यानं शुटिंगच्या वेळी एका पाण्याच्या टाकीत उडी मारली होती आणि ते मारताच त्यांच्या अंगावरील केस गेले. तुम्ही म्हणाल की पाण्यात उडी मारल्यावर कोणचे केस कसे जातील परंतु हे अर्ध सत्य आहे. पाणी होते परंतु त्यात काही केमिकल्स होते. त्या केमिकल्स अद्याप स्पष्ट माहिती नाही परंतु त्यानंतर त्यांनी आपल्या अंगावरील सगळे केस गमावले. त्यामुळे त्यांना पाहून लोकं घाबरूही लागले. परंतु आजही त्यांचे अनेक चित्रपट हे गाजत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 स्टंटमन यांनाही अनेक चित्रपटांतून लोकप्रियता मिळते परंतु त्यांच्यासाठी त्यांना मिळणारे यश हे काही सरळमार्गी नसते. त्यांनी बऱ्याच मोठ्या दिव्यातून जावे लागते. त्यामुळे सगळीकडे फक्त त्यांचीच चर्चा असते. अनेक स्टंटबाजी करताना अपघात झाला अथवा दुखापत झाली याबद्दलच्या घटनाही बाहेर घडताना दिसतात. त्यातून दाक्षिणात्त्य चित्रपटांमध्येही फार मोठ्या प्रमाणात स्टंटबाजी असते.