'3 स्टोरीज' चे नवे गाणे प्रदर्शित....

बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट, ऋचा चट्टा, रेणूका शहाणे यांचा नवा सिनेमा ३ स्टोरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 27, 2018, 05:10 PM IST
'3 स्टोरीज' चे नवे गाणे प्रदर्शित.... title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट, ऋचा चट्टा, रेणूका शहाणे यांचा नवा सिनेमा ३ स्टोरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमात एकाच वेली वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. मात्र विशेष म्हणजे या कथा एकमेकांशी संलग्न आहेत. या सिनेमातील थ्रिल आणि गुढता प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. या सिनेमाचे नवे गाणे आझादिया काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले.

सिनेमाबद्दल...

हे गाणे शर्मन जोशी, मसुमेह यांच्यासह अंकीत राठी आणि आयेशा यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे क्लिंटो केरिजो आणि बिनाका गोम्स यांनी गायले आहे. तर शील यांनी हे या गाण्याचे गीतकार आहेत. गाणे क्लिंटन केरिजो आणि सचिन मेहता यांनी संगीतबद्ध केले आहे. तर सिनेमाचे दिग्दर्शन अर्जुन मुखर्जी यांनी केले आहे. प्रिया श्रीधरन, रितेश सिद्धवानी आणि फरहान अख्तर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

पहा गाणे

लवकरच प्रदर्शित

या सिनेमातून रेणूका शहाणे सिनेमात कॅमबॅक करत आहे. तर आयशा आणि अंकीतचा हा पहिलाच सिनेमा आहे. हा सिनेमा ९ मार्चला प्रदर्शित होईल.