'मराठीची मलाइका...', Prajakta Mali चं आतापर्यंतचं सर्वात Bold फोटोशूट

Prajakta Mali Troll : प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये सुत्रसंचालन करताना दिसते. तर प्राजक्तानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असून तिला अनेकांनी तिच्या पोजवरून ट्रोल केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 23, 2023, 01:39 PM IST
'मराठीची मलाइका...', Prajakta Mali चं आतापर्यंतचं सर्वात Bold फोटोशूट title=
(Photo Credit : Prajakta Mali Instagram)

Prajakta Mali Troll : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबत तिच्या लूक्समुळे चर्चेत असते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. खरं सांगायचं झालं तर प्राजक्ता ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी देखील चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती अनेक गोष्टींवर स्पष्टपणे बोलताना दिसते. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच प्राजक्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे प्राजक्ता सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार होत आहे. 

प्राजक्तानं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. ही फोटोत प्राजक्तानं सिल्वहर शिमरी साडी नेसली आहे. हे फोटो शेअर करत प्राजक्तानं 'हुस्न-ओ-इश्क़ के दम से ज़माना... यही हक़ीक़त है बाक़ी फ़साना ...', असे कॅप्शन प्राजक्तानं दिलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चर्चेचा विषय ठरले आहेत. प्राजक्तानं शेअर केलेल्या या फोटोतील तिच्या पोजवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. तिला अनेकांनी अशा पोज देण्याचे कारण विचारले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्राजक्ताचा फोटो पाहिल्यानंतर एक नेटकरी त्यावर कमेंट करत म्हणाला, 'मराठीची मलाइका बनायच आहे का प्राजक्ता तुला.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ताई फिगर नाही चेहरा आवडतो तुमचा आम्हाला.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अग कहर नुसता.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'एक नंबर खूप भारी दिसतेस.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला माफ कर पण मी फ़साना हा शब्द  फर्साण असा वाचला.' तिसरा नेटकरी म्हणाला 'किसी का यूँ तो हुआ कौन उम्र भर फिर भी,ये हुस्न ओ इश्क़ तो धोका है.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'सध्या सगळेच पाठ दाखवून फोटो का काढत आहेत ??? पाठदुखी कंबरदुखी वर काही इलाज शोधण्याचा ट्रेंड सुरू आहे का??? नक्की दाखवायचं काय आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सुंदर ताई' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बस ना आता तेच फोटो किती दिवस टाकणार.' 

हेही वाचा : VIDEO : Jr. NTR चा चित्रपट पाहताना चाहत्याचं आनंदाच्या भरात धक्कादायक कृत्य; थिएटरला आग लागली अन्...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्राजक्तानं तिच्या अभिनयाची सुरुवात ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून केली होती. तर तिनं आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये इतकंच काय तर राणाबाजार या सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. याशिवाय प्राजक्ता सध्या तिच्या प्राजक्ताराज या दागिण्यांच्या ब्रॅंडमुळे चर्चेत आहे.