Junior NTR: आपलं लग्न हे अगदी थाटात व्हावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातून आपण सेलिब्रेटींचे लग्नसोहळे पाहिलेत तर आपल्याला लक्षात येईल की त्यांच्या लग्नातही कशाची कमी नसते. जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा आपल्यालाही अनेक गोष्टी या माहिती नव्हत्या. आपल्याला असेही वाटतं आले असेल की भारतातील सर्वात श्रीमंत आणि महागडं लग्न कोणाचे असेल तर ते म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे. परंतु तुम्हाला जाणून धक्का बसेल परंतु एका लोकप्रिय अभिनेत्यानं चक्क आपल्या होणाऱ्या बायकोच्या साडीसाठीच कोट्यवधी रूपये खर्च केले आहे.
सध्या याच अभिनेत्याची चर्चा आहे. त्यामुळे इतकं महागडं लग्न पाहून तुमच्या डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यातून हा अभिनेता कोण हे कळल्यावरही तुम्हाला आश्चर्याचा धक्का झाल्याशिवाय राहणार आज हाच अभिनेता थेट ऑस्करपर्यंत पोहोचला आहे.
परंतु सध्या चर्चा आहे ती म्हणजे ज्युनिअर एनटीआर याची. मागच्या वर्षी आलेल्या आरआरआर या चित्रपटानं अक्षरक्ष: इतिहास निर्माण केला होता. त्यातून बाहुबलीनंतर एस. एस. राजमौली यांच्या या चित्रपटानं जगभरात धुमाकूळ घातला होता. त्यातून या चित्रपटातील नाटू नाटू हे गाणंही प्रचंड गाजले होते. ज्यूनिअर एनटीआरला आपण कोण ओळखत नाही. आज त्याची ओळख ही जगभरात आहे. त्यातून त्याची चर्चाही अनेकदा होताना दिसते. परंतु तुम्हाला त्याच्या लग्नाविषयी फारच कमी माहिती असेल. परंतु तुम्हाला कळल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
या अभिनेत्याला यशही त्यावेळी मिळाले नव्हते ना त्याचा चित्रपट हा ऑस्करपर्यंत पोहोचला होता. परंतु तेव्हा त्यानं आपल्या लग्नात 18 कोटींचा मंडप घेतला होता आणि त्याचसोबत आपल्या बायकोच्या साडीसाठी तब्बल 1 कोटीची साडी घेतली होती.
हेही वाचा - OMG 2 चा वाद, महाकाल मंदिराच्या मुख्य पूजाऱ्याने दिला इशारा म्हणाले '...अन्यथा FIR दाखल करू'
ज्यूनिअर एनटीआरनं अरेंज मॅरेंज केलं आहे. त्याची बायको ही 18 वर्षांची होती. 5 मे 2011 रोजी त्यानं लक्ष्मी प्रणतीसोबत लग्न केले होते. त्याचे फोटोही तेव्हा टेलिव्हिजनवर आणि समाजमाध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले होते. तेव्हा तो 26 वर्षांचा होता आणि वर म्हटल्याप्रमाणे त्याची बायको ही 18 वर्षांची होती. लक्ष्मी या बिझनेसमन नरणे श्रीनिवास राव यांच्या कन्या आहेत. या दोघांना आता दोन मुलंही आहेत. ज्यूनिअर एनटीआर सध्या त्याच्या 'देवरा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून जान्हवी कपूर साऊथमध्ये डेब्यू करते आहे.
त्याच्या लग्नात एकूण 3000 हजाराच्या वर पाहुणे आले होते. त्याच्या एकूण लग्नाचा खर्चच 100 कोटी रूपये इतका होता. त्याच्या बायकोनं पिवळ्या रंगाची कांजिवरम साडी नेसली होती. ही साडी सोन्या-चांदीनं विणलेली होती. यावर तिचे दागिनेही फार महागडं होते.