रामचरणच्या लेकीचे लाड पुरवतायत मुकेश अंबानी; तिला दिली सर्वात महागडी भेट!

Mukesh Ambani's Gift for Ram Charan Daughter : रामचरण आणि उपासना यांना नुकतेच कन्यारत्न झाले आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. तुम्हाला माहितीये का की मुकेश अंबानी यांनी चक्क उपासना आणि रामचरण यांच्या लेकीला महागडं गिफ्ट दिलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 30, 2023, 04:08 PM IST
रामचरणच्या लेकीचे लाड पुरवतायत मुकेश अंबानी; तिला दिली सर्वात महागडी भेट! title=
June 30, 2023 | Mukesh ambani gives most expensive gift to the newborn daughter of ramcharan and mukesh ambani

Mukesh Ambani's Gift for Ram Charan Daughter : आरआरआर चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता राम चरणच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. लग्नाच्या तब्बल 11 वर्षांनंतर त्यांना मुलगी झाली आहे. त्यामुळे त्या दोघांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपुर्वीच राम चरणनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून आपल्याला मुलगी झाली असल्याची गोड बातमी दिली होती. त्यानंतर त्याची पत्नी उपासना हिला रूग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर ते दोघंही स्पॉट झाले होते. त्यांच्यावर चाहत्यांनी अक्षरक्ष: गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला होता. आता मुकेश अंबानींनीही त्यांच्या मुलीचे लाड करण्यात कोणतीच कदर सोडली नाहीये. मुकेश अंबानी यांनी चक्क रामचरण आणि उपासना यांच्या लेकीसाठी इतकी महागडी वस्तू दिली आहे की त्याचा विचार तुम्ही स्वप्नातही करू शकणार नाही. 

मुकेश अंबानी यांची श्रीमंती सर्वांनाच माहिती आहे. त्याचसोबत आत्तापर्यंत त्यांच्या श्रीमंतीचा अंदाजही लोकांनाही आलेला आहे. त्यांची जीवनशैली पाहून प्रत्येकालाच असे वाटते की त्यांच्यासारखे व्हावे. त्यांच्या राहणीमानापासून ते त्यांच्या जेवणा-खाण्यापर्यंत ते त्यांच्या फिरण्याच्या शानशौकीपासून सर्वच गोष्टींची चर्चा रंगलेली असते. त्यांच्या भेटवस्तूंचीही अनेकदा चर्चा रंगते. तुम्हाला माहितीये का की उपासना आणि रामचरण यांच्या लेकीसाठी मुकेश अंबानी यांनी चक्क सोन्याचा पाळणा भेट म्हणून दिला आहे. ज्याची किंमत 1 कोटी रूपये इतकी असल्याचे कळते आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या भेटवस्तूची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

मुकेश अंबानी यांना भेटवस्तू म्हणून द्यायला काय कमी नाही. त्यांच्याकडे सर्वकाही आहे. त्यामुळे त्यांना कशाचीच कमतरता नाही. अशाच त्यांनी दिलेल्या या भेटवस्तूनं अनेकांचे डोळे वर गेले आहेत तर काहीना याचे फार काहीच आश्चर्य वाटत नाहीये. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या या भेटवस्तूची. 

हेही वाचा - माफी मागण्याच्या स्टाईलनं अभिनेत्याच्या प्रेमात पडली अभिनेत्री; शेवटी गुरूजींना पैसे देऊन उरकलं लग्न!

रामचरण आणि उपासना यांनी 2011 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर त्यांना तब्बल 12 वर्षांनी मुलगी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर त्यांच्या मित्रमैत्रीणींमध्येही आनंदाचे वातावरण आहे. मागच्यावर्षी आलेल्या RRR या चित्रपटानं जगभर पुरता धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील गाणी ही प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामुळे हा चित्रपट तूफान गाजला. सोबतच या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तेव्हा तुम्हाला मुकेश अंबानी यांनी दिलेलं गिफ्ट आवडलं का?