Rakhi Sawant: शेवटी ती वाचली नाही... मुकेश अंबानी यांनी केली होती राखी सांवतला आईच्या उपचारासाठी मदत

आई मोठ्या आजाराशी झुंज देत असल्याने तिच्या उपचारासाठी पैसा गोळा करण्यासाठी राखीचे प्रयत्न सुरु होते. अशा अडचणीच्या परिस्थित प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) तिच्या मदतीला धावून आले होते. मुकेश अंबानी यांनी देखील राखी सांवतला आईच्या उपचारासाठी मदत केली होती.

Updated: Jan 28, 2023, 11:04 PM IST
Rakhi Sawant: शेवटी ती वाचली नाही... मुकेश अंबानी यांनी केली होती राखी सांवतला आईच्या उपचारासाठी मदत

Mukesh Ambani Help Rakhi Sawant : 'ड्रामा क्वीन' अशी ओळख असलेली अभिनेत्री राखी सावंतवर (Rakhi Sawant) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राखी सावंतची आई जया भेदा यांचे ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगामुळे निधन झाले आहे. आई मोठ्या आजाराशी झुंज देत असल्याने तिच्या उपचारासाठी पैसा गोळा करण्यासाठी राखीचे प्रयत्न सुरु होते. अशा अडचणीच्या परिस्थित प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) तिच्या मदतीला धावून आले होते. मुकेश अंबानी यांनी देखील राखी सांवतला आईच्या उपचारासाठी मदत केली होती.

राखीची आई जवळपास तीन वर्षांपासून कॅन्सरवर उपचार घेत होती. त्यातच त्यांना  ब्रेन ट्यूमर झाल्याचेही निदान झाले.  मागील दोन महिन्यापासून क्रीकेअर  रुग्णालायत  राखीच्या आईवर उपचार सुरु होते.  मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे आईचं निधन झालं अशी माहिती राखीने दिली आहे. 

आई बरी व्हावी उपचारासाठी पैसा उभा करण्यासाठी राखी सावंत प्रयत्न करत होती. रुग्णालयाने देखील उपचाराच्या दलात सवलत दिली होती.  मुकेश अंबानी यांनी देखील राखी सावंतला मदत केली. यानंतर राखी सावंतने अंबानी यांचे आभार मानले होते.  मुकेश अंबानी यांनी राखी सावंतच्या आईला उपचारासाठी आर्थिक मदत केल्याचे समजते. आईवर रुग्णालायत उपचार सुरु असताना राखी सावंत जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करत होती.

मराठी बिग बॉगसमध्ये राखी सावंतला वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली होती.  बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच तिला आईची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली. यानंतर हॉस्पीटलमध्ये ती आईसोबतच होती. एकीकडे आईचे आजारपण आणि दुसरीकडे वैयक्तीत आयुष्यातील प्रॉब्लेम. हा काळ राखी सावंतसाठी अत्यंत कठीण काळ होता.