Finally ! मुक्ता बर्वे बोहल्यावर चढणार : VIDEO

पुन्हा एकदा मुक्ता बर्वेच्या लग्नाची चर्चा 

Updated: Jun 9, 2021, 10:54 AM IST
Finally ! मुक्ता बर्वे बोहल्यावर चढणार : VIDEO

मुंबई : लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. काहींनी कोरोनाकाळातील सगळे नियम पाळत लग्न केलं तर काहींनी रजिस्टर लग्न करून संसाराला सुरूवात केली. लवकरच अभिनेत्री मुक्ता बर्वे बोहल्यावर चढणार असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

अभिनेत्री मुक्ता बर्वेची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठीवरती 'अजूनही बरसात आहे' ही नवी मालिका 12 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेमाला कुठे असते Expiry Date म्हणतं मुक्ता बर्वे आणि उमेश कामत ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

मुंबईत नुकतंच पावसाचं आगमन झालं आहे. असं असताना अतिशय फ्रेश आणि प्रेमाची बरसात करणारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेची वेळ अजून कळलेली नाही. पण मुक्ता बर्वे आणि लव्ह स्टोरी हे खूप खास समीकरण आहे. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका आणि 'मुंबई-पुणे-मुंबई' या सिनेमाच्या तिन्ही भागांनी प्रेक्षकांची मनोरंजन केलं आहे. 

अभिनेता उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ही फ्रेश जोडी या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उमेश कामतला देखील बऱ्याच दिवसांनी आपण छोट्या पडद्यावर पाहत आहोत. या नव्या मालिकेची झलक समोर आली आहे. 

35 वर्षीय अविवाहित तरूणीची भूमिका मुक्ता बर्वे या मालिकेत साकारत आहे. उमेश कामत आणि मुक्ताची भेट एका शुभमंगल या वधुवर सुचक मंडळासमोर होते. उमेश कामत हा आदि नावाची भूमिका साकारत आहे.