कंगना आणि बहिण रंगोलीकडून पोलिसांच्या समन्सला तिसऱ्यांदा केराची टोपली ?

कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली हिला मुंबई पोलिसांनी २३ आणि २४ तारखेला मुंबईला वांद्रे पोलीस स्टेशनला येण्याचा समन्स 

Updated: Nov 23, 2020, 09:11 AM IST
कंगना आणि बहिण रंगोलीकडून पोलिसांच्या समन्सला तिसऱ्यांदा केराची टोपली ?

मुंबई : कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली हिला मुंबई पोलिसांनी २३ आणि २४ तारखेला मुंबईला वांद्रे पोलीस स्टेशनला येण्याचा समन्स बजावला होता मात्र कंगना आज ही मुंबई पोलिसांसमोर येणार नसल्याचे वृत्त समोर येतेय. मुंबई पोलिसांनी कंगना आणि तीच्या बहिणी विरोधात वांद्रे न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा नोंदवला असून जवाब आणि चौकशीसाठी या आधी दोन वेळा दोघींना समन्स बजावला होता मात्र त्या दोघी आल्या नाहीत. 

आता तिसऱ्यांदा कंगनाने वांद्रे पोलिसांचा समन्स धुडकावून लावला....त्यामुळे आता मुंबई पोलिस कंगना आणि तिच्या बहिणीवर काय कारवाई करतायत याकडे लक्ष आहे. दरम्यान कंगनाने तिच्या भावाचं लग्न असल्याने येणं शक्य नसल्याचं वकिलामार्फत कळवलं आहे. 

नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या या बहिणींच्या  आडचणीत वाढ असल्याचं दिसून येत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना कामय चर्चेत होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहिण रंगोलीला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलंय.

या दोघींनी आपल्या भावाच्या लग्नकार्यात व्यस्त असल्याचे सांगत चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या. कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ ((अ) १५३  (अ) आणि १२४ (अ) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. कास्टिंग दिग्दर्शक साहिल अशरफ सैयद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे कोर्टाने कंगना आणि रंगोलीविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.