अभिनेत्री झायरा वसिमची छेड काढणा-याला अखेर अटक

दंगल सिनेमा फेम अभिनेत्री झायरा वसिमची छेड काढणा-याला अखेर अटक करण्यात आली आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 11, 2017, 01:26 PM IST
अभिनेत्री झायरा वसिमची छेड काढणा-याला अखेर अटक title=

मुंबई : दंगल सिनेमा फेम अभिनेत्री झायरा वसिमची छेड काढणा-याला अखेर अटक करण्यात आली आहे. 

विकास सचदेव असं या अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पत्नी दिव्या सचदेव हिने अभिनेत्रीवर आरोप केला आहे की, झायरा ही पब्लिसिटी स्टंट करत आहे. आरोपीच्या व्यक्तीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

विस्तारा विमान कंपनीच्या दिल्ली-मुंबई विमान प्रवासा दरम्यान झायरा वासिमच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाने तिची छेड काढली होती. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करुन स्वतः झायरानंच या घटनेचं वास्तव सांगितलं. तिच्या या व्हिडिओची पोलिसांनीही दखल घेतली. ही संपूर्ण घटना वर्णन करत असतानाच झायराला रडू कोसळलं. यावेळी विमानातील कुणीही सहप्रवासी मदतीला आलं नसल्याची खंत तिनं व्हिडिओत व्यक्त केली.