Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) 'बिग बॉस सीझन 15' पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही एकमेकांसोबत सतत राहतात. (naagin actress tejaswini prakash got engaged secretly with boyfriend photo goes viral)
सध्या तेजस्वी प्रकाशचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो व्हायरल होताच तेजस्वी प्रकाशच्या एंगेजमेंटच्या बातम्यांनी जोर धरला. या फोटोमध्ये तेजस्वी कॅमेऱ्यासमोर हिऱ्याची मोठी अंगठी फ्लॉंट करताना दिसत आहे. पण तिची खरंच एंगेजमेंट झाली आहे का?
फोटोमध्ये तेजस्वी प्रकाश तिच्या हातात घातलेली अंगठी कॅमेऱ्यासमोर फ्लॉंट करताना दिसत आहे. ज्यात ती खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत तिनं फुलांचा गुच्छ धरला आहे. यासोबतच लाईट मेकअप आणि मोकळे केस ठेवून तिने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.
तेजस्वी प्रकाशच्या चाहत्यांनी हा फोटो पाहताच बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत साखरपुडा केला की काय असे प्रश्न कमेंट्समधून विचारायाला सुरूवात केली. फोटोचे कॅप्शनही तेजस्वीने अशा प्रकारे लिहिले आहे की लोकांचा संशय तिच्या साखरपुड्यावरच राहिला. हा फोटो शेअर करत तेजस्वीने कॅप्शनमध्ये लिहिले- 'Big Day.' यासोबतच रिंग आयकॉनही शेअर केला होता.
खरं म्हणजे तेजस्वी प्रकाशने साखरपुडा केला नसून डायमंड रिंगच्या जाहिरातीचे शूटिंग केले आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 'बिग डे' या तिच्या कॅप्शनखाली लिहिलेल्या ओळींद्वारे हे उघड झाले आहे.