मुंबई : झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या सारेगमप या सप्तसुरांची बरसात करणा-या मैफिलीचा शानदार महाअंतिम सोहळा मुंबईत संपन्न झाला. सारेगमपच्या तेराव्या पर्वाचा महाविजेता कल्याणचा नचिकेत लेले ठरला.
तर यवतमाळचा उज्ज्वल गजभार द्वितीय आणि पुण्याचा अक्षय घाणेकर तृतीय स्थानी आला. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दहा तास अशा प्रकारचा हा संगीतमय सोहळा आयोजित करण्यात आला होता.