नागार्जुनच्या सूनेचा पायगुण; लक्ष्मीच्या रुपात दारी आली 25000000 ची वस्तू

दक्षिण भारतीय अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी लग्न करतोय. नागार्जुन आपल्या मुलाला आणि सुनेला त्यांच्या लग्नात एक अनमोल भेट देणार आहे. या भेटीबाबत सुनेचा पायगुण असल्याचं म्हटल जात आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 30, 2024, 03:59 PM IST
नागार्जुनच्या सूनेचा पायगुण; लक्ष्मीच्या रुपात दारी आली 25000000 ची वस्तू

सध्या नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. नागार्जुन आपल्या मुलाच्या लग्नामुळे खूप आनंदी आहे. या आनंदात तो आपल्या मुलाला आणि सुनेला त्यांच्या लग्नात एक मौल्यवान भेट देणार आहे. ही भेट म्हणजे त्या सुनेचा पायगुण असल्याच म्हटलं जात आहे. नागा चैतन्य आणि शोभिताचे लग्न ४ डिसेंबरला हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

नागार्जुनची खास भेट 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akkineni Nagarjuna  (@thekingnagarjuna)

एका रिपोर्टनुसार, नागार्जुन त्यांच्या लग्नात मुलगा आणि सुनेला 2.5 कोटी रुपयांची मौल्यवान भेट देणार आहे. ही भेट एक उत्तम कार आहे. या कारची नोंदणी करण्यासाठी अभिनेता नागार्जुन हैदराबाद येथील आरटीओ कार्यालयात पोहोचला आहे. ही कार ते त्यांचा मुलगा नागा चैतन्य आणि सून शोभिता यांना त्यांच्या लग्नाच्या दिवशी देणार असल्याचे बोलले जात आहे.

लग्नाचे विधी सुरू 

नुकताच नागा चैतन्य आणि शोभिता यांचा हळदी सोहळा पार पडला. त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. हळदी समारंभात दोघेही खूप खुश दिसत होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत आहे. 

दोघांची भेट कशी झाली?

नागा चैतन्य आणि शोभिता यांचे लग्न सध्या चर्चेत आहे. काही काळापूर्वी नागा चैतन्यने हे दोघे कसे भेटले आणि कधी प्रेमात पडले याबद्दल मीडियाला सांगितले होते. नागाने सांगितले की, तो शोभिताला एका ओटीटी शोच्या लॉन्चिंगवेळी भेटला होता. दोघेही तिथे थोडा वेळ बोलले. नंतर ते पुन्हा भेटले. नागाने असेही सांगितले की शोभिताचे वागणे त्याच्यासारखेच आहे. ती कुटुंबाला खूप महत्त्व देते.

शोभिता नागा यांची दुसरी पत्नी 

नागा आणि शोभिता लवकरच लग्न करणार आहेत. पण शोभिता ही नागा चैतन्याची दुसरी पत्नी आहे. याआधी त्याने अभिनेत्री समंथा रुथसोबत लग्न केले होते मात्र काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More