घटस्फोटानंतर Naga Chaitanya 'या' अभिनेत्रीसोबत परदेश सफारीवर; फोटोंमुळे चर्चांना उधाण

समंथा रुथ प्रभूसोबत घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्यच्या आयुष्याच प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री; परदेशातील तिच्यासोबत खास फोटो समोर आल्यानंतर चर्चांना उधाण    

Updated: Nov 26, 2022, 10:56 AM IST
घटस्फोटानंतर Naga Chaitanya 'या' अभिनेत्रीसोबत परदेश सफारीवर; फोटोंमुळे चर्चांना उधाण  title=

Naga Chaitanya with Sobhita Dhulipala : साऊथ स्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Prabhu) यांनी घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. समंथापासून विभक्त झाल्यानतंर नागा चैतन्य एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर अभिनेता तिच्यासोबत परदेश सफारीवर गेल्याचं कळत आहे. नागा चैतन्यच्या मनात खास जागा मिळवणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) आहे.  नागा आणि शोभिता सध्या परदेशात सुट्टीचा आनंद घेत असल्याचं व्हायरल  फोटोंवरुन दिसून येत आहे. 

सध्या नागा चैतन्य आणि शोभिताचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघे परदेशात फिरताना दिसत आहे.  फोटोमध्ये दोघांनी काळ्या रंगाचे कपडे घातल्याचं दिसून येत आहे. नागा आणि शोभिताचे फोटो एका फॅन पेजवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नागा आणि शोभिता यांनी त्यांच्या नात्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण व्हायरल होत असलेल्या फोटोंवरुन दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज चाहत्यांकडून वर्तवण्यात येत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा प्रभूला (Samantha Prabhu) घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलिपालाच्या (Sobhita Dhulipalab) प्रेमात पडलाय. शोभिता धुलिपाला ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे. दरम्यान शोभिता नागासोबत त्यांच्या नवीन घरात दिसली होती. तेव्हापासून या दोन स्टार्सच्या अफेअरच्या बातम्यांना व चर्चांना ऊत आले आहे.