15 वर्षांनंतर नागार्जून करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

या कलाकारांसोबत शेअर करणार स्क्रिन

15 वर्षांनंतर नागार्जून करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबई : साऊथचा सुपरस्टार नागार्जून तब्बल 15 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये येत आहे. या सिनेमाच शुटिंग बुल्गारियामध्ये सध्या सुरू असून या सिनेमात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे.  नागार्जून दिग्दर्शक आयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ब्रम्हास्त्र या सिनेमाचे प्रोड्युसर करण जोहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये नागार्जूनसोबत आलिया - रणबीर देखील आहेत. या सिनेमांत आपल्याला बिग बी अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. तसेच टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय देखील या सिनेमात आहे. 

साऊथचा सुपरस्टार नागार्जून 'ब्रम्हास्त्र' या सिनेमातून 15 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये काम करत आहे. त्यामुळे नागार्जून आणि प्रेक्षक दोघे देखील उत्सुक आहेत. करण जोहरने हा फोटो शेअर करत खूप छान पोस्ट लिहिली आहे. या अगोदर नागार्जून यांनी बॉलिवूडमध्ये 'शिवा', 'खुदा गवाह', 'एलओसी - कारगिल', 'अंगारे' आणि 'जख्म' सारख्या सिनेमांत काम केलं आहे.