गुलाबी स्कर्टमध्ये हँडसम अभिनेत्याचा डान्स; Video Viral

Nakuul Mehta and Jainil Mehta Video : नकुल मेहता आणि जेनिलनं केलेला हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नकुल मेहतानं गुलाबी रंगाचं स्कर्ट परिधान करत डान्स केला आहे. त्याच्या डान्सिंग स्किल्सची चांगलीच चर्चा सुरु आहे. तुम्ही पण नक्कीच पाहा हा व्हिडीओ...

दिक्षा पाटील | Updated: May 29, 2023, 06:44 PM IST
गुलाबी स्कर्टमध्ये हँडसम अभिनेत्याचा डान्स; Video Viral title=
(Photo Credit : Nakul Mehta Insatgram)

Nakuul Mehta and Jainil Mehta Video : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता नकुल मेहता हा त्याच्या इश्कबाज या मालिकेसाठी ओळखला जातो. या मालिकेनंतर त्याच्या चाहत्यांच्या यादीत लाखोंच्या संख्येन वाढ झाली असं म्हणायला हरकत नाही. या मालिकेनंतर नकुल मेहता ‘बडे अच्छे लगते हैं 3’ मालिकेतून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आला. नकुल मेहता एक उत्तम डान्सर आहे. त्याचे अनेक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. नकुल मेहताचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो जेनिल मेहकासोबत डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओनं सगळ्यांना वेड लावलं आहे. 

नकुल मेहतानं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नकुल आणि जेनिल हे दोघं रणबीर कपूर आणि नरगिस फाखरी स्टारर ‘रॉकस्टार’ या चित्रपटातील 'हवा हवा' या गाण्यावर डान्स करत आहेत. त्या दोघांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केला असून त्यावर गुलाबी रंगाचं स्कर्ट परिधान केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत नकुलनं कॅप्शन दिलं की "जेनिल मला BRUT च्या व्हिडीओत दिसला. त्या व्हिडीओत जेनिल ढोली तारो गाण्यावर न्युयॉर्कच्या रस्त्यावर डान्स करत होता. त्यानंतर त्याचे व्हिडीओ पाहून मी त्याच्या कलेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा चाहता झालो. दुसरीकडे साता समुद्रापार तो त्याच्या दिवसाची शेवट ही त्याचा आवडता कार्यक्रम ‘बडे अच्छे लगते हैं ’ बघून संपवत होता. मग काय यासाठी एक सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे आणि ते सुद्धा आम्हा दोघांच्या आवडत्या गाण्यावर." या सोबत नकुल मेहतानं #MenInSkirts हे हॅशटॅग देखील दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नकुल मेहताच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांना अप्रतिम डान्स केल्याचे म्हटले आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी त्यांच्या डान्सिंग स्किलची स्तुती केली आहे.

हेही वाचा : प्रेम वाईट नसतं, पण त्याचा गैरवापर...; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पोस्टमुळे एकच चर्चा

दरम्यान, ‘बडे अच्छे लगते हैं 3’ या कार्यक्रमाची सुरुवात ही 25 मे पासून झाली आहे. या मालिकेतून पुन्हा एकदा नकुल मेहता आणि दिशा परमारची जोडी पाहायला मिळाली आहे. नकुलनं या मालिकेत रामची भूमिका साकारली आहे तर दिशानं प्रियाची. राम एक बिझनेसमॅन आहे आणि प्रिया एक डेन्टिस्ट आहे. नकुलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं 'प्यार का दर्द है – मीठा मीठा, प्यारा प्यारा' या मालिकेतून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर  ‘इश्कबाज’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘आय डोंट वॉच टीव्ही’, ‘नेव्हर किस योर बेस्ट फ्रेंड’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकांमध्ये काम केले.