'मला माहित होतं की हे सगळं...', तनुश्री दत्ताच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी सोडलं मौन

Nana Patekar on Tanushree Dutta : नाना पाटेकरांनी 6 वर्षांनंतर तनुश्री दत्ताच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर सोडलं मौन

दिक्षा पाटील | Updated: Jun 23, 2024, 03:59 PM IST
'मला माहित होतं की हे सगळं...', तनुश्री दत्ताच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी सोडलं मौन title=
(Photo Credit : Social Media)

Nana Patekar on Tanushree Dutta : 2018 मध्ये मीटू मूव्हमेंट दरम्यान, अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर शारिरीक शोषण केल्याचे आरोप केले होते. आता नाना पाटेकरांनी या सगळ्या प्रकरणावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर तनुश्रीनं हे आरोप 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटा दरम्यान, तिच्यासोबत चुकीची वर्तवणूक केली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी म्हटलं होतं की त्यांना माहित होतं की हे सगळे आरोप खोटे आहेत. त्यांनी काही केलं नव्हतं म्हणून ते तेव्हा शांत होते. 

तनुश्रीनं 2018 मध्ये भारतात MeToo मूव्हमेंटची , सुरुवात केली होती. तेव्हा तिनं नाना पाटेकर, कोरियोग्राफर गणेश आचार्य आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. तनुश्रीनं तिच्या वक्तव्यात असं म्हटलं होतं की 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या हॉर्न ओके प्लीज च्या गाण्याच्या शूटिंग दरम्यान, नाना पाटेकरांनी तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. तिनं सांगितलं की गाणं एकाच भूमिकेवर डायरेक्ट होणार होतं, पण मग शूटिंगच्या दिवशी नाना पाटेकर हे सेटवर उपस्थित असायचे. 

हेही वाचा : ...पण या साऱ्याला अर्थ काय? त्याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री मनवा नाईकचा थेट सवाल; घटनाक्रम वाचून हादराल

याच घटनेवर तनुश्री यांनी 'द लल्लनटॉप' ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी सांगितलं की तिला सुरुवातीपासून माहित होतं की तनुश्रीनं लावलेले सगळे आरोप हे खोटे आहेत. त्यामुळे त्यांना कधी राग आला नाही. नाना पाटेकर म्हणाले, 'मला माहित होतं की हे सगळं खोटं आहे. त्यामुळे मला कधी राग आला नाही. जर सगळं खोटं होतं तर मला राग का आला पाहिजे? आणि त्या सगळ्या गोष्टी या खूप जुन्या आहेत. ते झालं. त्याविषयी आपण काय बोलायचं? सगळ्यांना सत्य माहित होतं. जेव्हा काही झालंच नाही तर मी त्यावेळी काय बोलू शकत होतो? अचानक कोणी येऊन म्हणतंय की तू हे केलं तू ते केलं. मी या सगळ्यावर काय उत्तर दिलं असतं? मी त्यावेळी हे बोलायला हवं होतं का की मी हे केलं नाही? मला सत्य माहित आहे की मी नाही केलं.'