Anurag Kashyap on Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे आपण सगळेच फॅन आहोत. त्यांच्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या भुमिकांचे आपल्याला आजही खूप कौतुक आहे. त्यांचा असा एकही सिनेमा नसले जो आपण पहिला नसेल. परंतु असा एक हॉलिवूडचा (Hollywood) भव्य दिव्य सिनेमा होता जो त्यांनी चक्क नाकारला होता. (Nana Patekar Rejects major role in hollywood film with leonardo decaprio latest bollywood news)
एका मुलाखतीदरम्यान अभिनेता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांने हा किस्सा सांगितला आहे. हॉलिवूडचा सगळ्यात दिग्गज अभिनेता आणि टायटॅनिकचा हिरो लिओनार्डो डायकॅपेरियो हा या चित्रपटाचा प्रमुख नायक होता. परंतु या चित्रपटातील एका भुमिकेमुळे नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी चक्क नकार दिला आणि त्यांच्या हातून हॉलिवूड चित्रपट गेला. परंतु नाना यांनी नक्की नकार कोणत्या गोष्टीला दिला होता आणि का?
आजकाल हिंदी कलाकारच काय तर प्रादेशिक चित्रपटांमधून काम करणारे दिग्गज कलाकारही हॉलिवूडमध्ये काम करताना दिसतात. त्यामुळे आता ग्लोबल सिनेमामध्ये आपल्याला या गोष्टी अगदी सहज पाहायला मिळतात. त्यातून लिओनार्डो डायकॅपेरिओ (Leonardo Dicaprio) या ग्लोबल स्टारसोबत काम करण्याची तर सगळ्यांचीच इच्छा असते. त्यातून त्याच्या एका चित्रपटात तरी आपली भुमिका असावी अशी मनोमनं सगळ्यांचीच इच्छा असते. बॉलिवूडमधील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते बिग बी यांनीही द ग्रेट गास्टबे या चित्रपटात लिओनार्डो डायकॅपेरिओसोबत भुमिका केली होती. आज प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि दिपीका पादूकोण आंतरराष्ट्रीय सिनेमांतून पुढे येत आहेत.
दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यानं एका मुलाखतीदरम्यान हा किस्सा सांगितला आहे की, हॉलिवूडचे दिग्दर्शक रिडले स्कॉट यांना त्यांच्या बॉडी ऑफ लाईज चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर यांना कास्ट करायचे होते. अनुराग कश्यपनं सांगितलं "रिडले स्कॉट यांनी 'द पूल' चित्रपट पाहिला आणि मला एक ईमेल पाठवला. त्यांना नाना पाटेकर यांना 'बॉडी ऑफ लाईज'मध्ये मार्क स्ट्राँगच्या भूमिकेसाठी कास्ट करायचे होते. मी नाना पाटेकर यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितले की, रिडले स्कॉटला त्याच्या चित्रपटामध्ये तुम्हाला कास्ट करायचे आहे. त्यावर नानांनी उत्तर दिले, दहशतवाद्याची भूमिका आहे, करणार नाही.
बॉडी ऑफ लाईज (Body of Lies) या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो आणि रसेल क्रो यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा 2008 मध्ये प्रदर्शित झालेला स्पाय थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटानं त्यावेळी मोठ्या प्रमाणात बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते.
नाना पाटेकर यांच्या हिंदी आणि मराठी चित्रपटातील भुमिका विशेष गाजल्या आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि नटसम्राट (Natsamrat) या चित्रपटातील त्यांच्या भुमिका विशेष गाजल्या.