मुंबई : काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर प्रचंड वादग्रस्त ठरलेलं 'नथुराम गोडसे' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. एकाच वेळी येऊ घातलेल्या दोन नाटकांमुळे 'नथुराम विरुद्ध नथुराम' असं चित्र रंगभूमीवर दिसणार असून, त्यावरून वादाचे 'प्रयोग' रंगण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी रंगभूमीवर गाजलेले 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे माऊली प्रॉडक्शनचं नाटक लवकरच पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. त्याचबरोबर या नाटकात 'नथुराम'च्या भूमिकेत दिसलेले अभिनेते शरद पोंक्षे यांनी 'नथुराम गोडेसे बोलतोय' हे नाटक घेऊन येत असल्याचं जाहीर केलं आहे. नाटकाचं शीर्षक जवळपास सारखं असल्याने त्यावरून न्यायालयीन लढाई सुरु झाली असून निर्माते उदय धुरत यांनी पोंक्षे यांना ७२ तासांचा कालावधी दिला असून जर त्यांनी माघार घेतली नाही तर कोर्टाची पायरी चढण्याची तयारी सुरु केली आहे.
ज्येष्ठ नाटककार प्रदीप दळवी लिखित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक नाट्यनिर्माते उदय धुरत यांनी १० जुलै १९९८ साली माऊली प्रॉडक्शनतर्फे रंगभूमीवर आणलं होतं. या नाटकाचं दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विनय आपटे यांनी केलं होतं. शरद पोंक्षे यांनी त्यात नथुरामची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका लोकप्रियही ठरली होती. वादग्रस्त विषयामुळे हे नाटक खूप चर्चेत राहिलं आहे. नाटकाचे ८१६ प्रयोग झाल्यानंतर २०१६ मध्ये निर्माते धुरत यांनी हे नाटक थांबविण्याचा निर्णय घेतला.
नाट्यनिर्माते धुरत 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. विवेक आपटे यांचं दिग्दर्शन करीत असून, त्याच्या तालमी ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. या नाटकात 'नथुराम'च्या भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले दिसणार आहे. हे नाटक ऑक्टोबरमध्ये येणार असल्याची जाहिरात जुलैमध्ये वर्तमानत्रांत प्रसिद्ध झाली होती. 'नथुरामच्या भूमिकेतील कलाकाराचे नाव निश्चित झाल्यानंतर आता नाटकाच्या तालमी सुरू होत आहेत. नोव्हेंबरमध्ये हे नाटक रंगभूमीवर येईल', असं दिग्दर्शक विवेक आपटे यांनी सांगितलं.
माऊली प्रॉडक्शन्सची जाहिरात पाहून शरद पोंक्षे यांनी 'नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाची लेखक दिग्दर्शकाचे नाव नसलेली जाहिरात १५ ऑगस्टला प्रसिद्ध केली. पोंक्षे या नाटकात प्रमुख भूमिकेत असून, नाटकाचे ५० प्रयोग होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 'एवढ्या मोठ्या कलाकाराला एका ज्येष्ठ नाटककाराच्या संहितेची - शीर्षकाची गरज का भासली? नाटकाच्या संहिता - शीर्षकावरून न्यायालयीन लढाई होईल', असे धुरत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. या संदर्भात धुरत यांच्याकडून पोंक्षे यांना आतापर्यंत तीन नोटिसा पाठविण्यात आल्या असून शेवटच्या नोटीसची मुदत ७२ तासांची आहे. या पत्रकार परिषेदेत कायदेशीर माहिती जेष्ठ वकील ए. एल. गोरे यांनी दिली.
नवा नथुराम कोण?
'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक नव्याने रंगभूमीवर येत असताना 'नथुराम'च्या भूमिकेचे आव्हान कोण पेलणार याविषयी उत्सुकता होती. नथुरामच्या भूमिकेसाठी सुमारे २५-३० कलाकारांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यानंतर अभिनेता सौरभ गोखलेची निवड झाली. सौरभ ही आव्हानात्मक भूमिका कशी साकारणार याकडे नाट्यरसिकांसह नाट्यसृष्टीचे लक्ष असेल.
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 156/9
|
VS |
LSG
160/5(19.5 ov)
|
| Lucknow Super Giants beat Sunrisers Hyderabad by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.