मोहम्मद रफी यांच्यासाठी बनारसवरुन बोलावले होते पंडित

नशिब आजमावण्यासाठी त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी मुंबई गाठली.

Updated: May 5, 2021, 07:38 PM IST
मोहम्मद रफी यांच्यासाठी बनारसवरुन बोलावले होते पंडित title=

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार नौशाद अली यांच्यावर चाहत्यांनी भरभरुन प्रेम केलं. नौशाद यांनी चित्रपटांपेक्षा संगीताला प्राधान्य दिलं. कदाचित म्हणूनच त्यांचं संगीत अजूनही लोकांच्या मनामनांत आहे. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1919 रोजी लखनऊमधील मुंशी वहीद अली यांच्या घरात झाला. त्यांचं शिक्षण लखनौमध्येच झालं होतं. शहरातील संस्कृती शास्त्रीय संगीताशी संबंधित असल्यानं त्यांनाही संगिताची आवड निर्माण झाली. त्यानंतर नौशाद यांनी उउस्ताद गुरबत अली, उस्ताद यूसुफ अली आणि उस्ताद बब्बन यांच्याकडून भारतीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं.

नशिब आजमावण्यासाठी त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी मुंबई गाठली. हिंदुस्थानी संगीताला एका वेगळ्या टप्प्यावर आणण्याचे काम त्यांनी केलं. हिंदी चित्रपटसृष्टी त्यांच्या वाद्य कलेने आनंदित झाली. संगीताव्यतिरिक्त त्यांनी बऱ्याच शेर-ओ-शायरीही केल्या.

1940मध्ये 'प्रेम नगर' नौशाद यांना प्रथमच स्वातंत्र संगीत देण्याची संधी मिळाली. यानंतर 'रतन' गाण्यावरून त्यांना ओळख मिळाली. त्यानंतर 64 वर्ष त्यांनी बॉलिवूडमध्ये संगीताची जादू सुरूच ठेवली. मात्र हे लक्षात घेण्यासारखं आहे की, अशी मोठी कारकीर्दीत असलेले नौशाद यांनी केवळ 67 चित्रपटांमध्येच संगीत दिलं.

आजची पिढी आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखते, पण त्य़ावेळी नौशाददेखील परफेक्शनिस्ट होते. यावरुन एक किस्सा देखील जोडलेला आहे. एकदा 'मन तड़पत हरी दर्शन को'

या गाण्यात मोहम्मद रफी यांना काही संस्कृत शब्द योग्यरित्या उच्चारता येत नव्हते, तेव्हा बनारसच्या नौशाद यांनी संस्कृत पंडितांना निरोप पाठवला. त्यांनी रफी यांना संस्कृत शब्द योग्य उच्चारण करण्यास मदत केली, त्यानंतर नौशाद यांनी अंतिम रेकॉर्डिंगला मान्यता दिली.  हे गाणे जगभरातील मंदिरांमध्ये अजूनही गायलं जातं आणि ऐकलं जातं.

नौशाद अली यांच्या लग्नाशी संबंधित एक किस्सा देखील आहे. नौशाद साहेब, ज्यांना आपण महान संगीतकार मानतो, त्यांना लग्नासाठी टेलर म्हणून स्वत: ची ओळख करून द्यावी लागली.  त्यांचं कुटुंब हिंदी चित्रपट आणि संगीताच्या विरोधात होते. त्यावेळी ते वाईट काम मानलं जायचं. ज्यावेळी नौशाद यांचं लग्न ठरलं त्यावेळी ही गोष्ट त्यांच्या सासऱ्यांपासून लपवून ठेवली होती.

त्याहूनही रोचक बाब म्हणजे नौशाद अली यांच्या लग्नात त्यांचं एकमेव संगीतबद्ध गाणं वाजलं होतं, मात्र कोणालाही माहिती नव्हतं. नौशाद अली यांनीही याचा फायदा घेतला. त्यांनी लग्नातील पाहुण्यांना विचारलं की, त्यांना गाण्याचे सूर कसे वाटले? आवडले का सूर?, मग सर्वांनी गाण्याचं कौतुक केलं.

नौशाद यांचा एक किस्सा 'मुगल-ए-आजम' चित्रपटाशी देखील संबंधित आहे. त्यांनी आपलं 'ए मोहब्बत जिंदाबाद' सुंदर बनविण्यासाठी 100 संगीतकारांचा वापर केला. त्याचवेळी, 'प्यार किया तो डरना क्या' या प्रसिद्ध गाण्याला सुंदर बनवण्यासाठी नौशाद यांनी लता मंगेशकर यांना बाथरूममध्ये उभे राहून गाणं गाण्यास सांगितलं होतं.

नौशाद अली 1940 ते 2006 पर्यंत संगीत जगतात सक्रिय राहिले. 2006 मध्ये 'ताजमहाल' सिनेमाला त्यांनी अखेरच संगीत दिलं. त्यांनी 'दुनिया के रखवाले', 'मधुबन में राधिका नाचे', 'मोहे भूल गए सांवरिया', 'मोहे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे', 'नैन लड़ जहिएं' आणि 'दुख भरे दिन बीते रे भैया' यासारख्या गाण्यांना संगीत दिलं.

5 मे 2006 रोजी नौशाद अली यांनी या जगाला निरोप दिला. त्यांना 1982मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 1984 मध्ये लता अलंकरण आणि 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.