जेव्हा सलमान आणि शाहरूखला ममता कुलकर्णी एका छोट्या कारणामुळे ओरडली

ममता कुलकर्णी, अभिनेता शाहरूख खान, सलमान खान 'करण अर्जुन' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. 

Updated: May 5, 2021, 07:02 PM IST
जेव्हा सलमान आणि शाहरूखला ममता कुलकर्णी एका छोट्या कारणामुळे ओरडली

मुंबई : अभिनेत्री ममता कुलकर्णी आज रूपेरी पडद्यापासून जरी दूर असली, तरी एक चित्रपटामुळे ती कायम चर्चेत असते.  25 वर्षांपूर्वी ममता कुलकर्णी, अभिनेता शाहरूख खान, सलमान खान 'करण अर्जुन' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. 'दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे' या सुपरहिट चित्रपटानंतर राकेश  रोशन निर्मित आणि दिग्दर्शित 'करण अर्जुन' चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाला. या  चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा सध्या तुफान चर्चेत आहे. 

हा मजेशीर किस्सा शाहरूखने 'बिग बॉस'मध्ये शेअर केला. शाहरूख म्हणाला  'भांगडा पाले' गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं, तेव्हा सलमान आणि मला काही डान्सच्या स्टेप जमत नव्हत्या. यापुढे शाहरूख म्हणाला, 'ममता एक अशी व्यक्ती आहे जिने मला आणि सलमानला असं ओरडलं आहे. तेव्हा मला वाटतं मी आणि सलमान ममताच्या  मागे उभे होतो. दिग्दर्शकांनी ओके सांगितलं पण ममता समाधानी नव्हाती'

पुढे शहरूख म्हणाला, ' चित्रीकरण झाल्यानंतर मी आणि सलमान उभे होतो. तितक्यात ममताने आम्हाला शिटी मारून हाक मारली. आम्हाला वाटलं दुसऱ्याला हाक मारली, पुन्हा तिने आम्हाला बोलावलं आम्ही गेलो. तेव्हा ममता आम्हाला म्हणाली रोज रिहर्सलसाठी येत जा मी स्टेप चांगल्या करते. तुम्ही खराब करता. '

'ममताचं बेलणं ऐकल्यानंतर आम्ही म्हणालो ही मायकल जॅक्सन किंवा प्रभू देवा प्रमाणे डान्स करते का?. आम्हाला तेव्हा वाईट वाटलं. त्यानंतर सलमान आणि मी ठरवलं. आम्ही रात्री रिहर्सल करू लागलो. ऐके दिवशी असं झालं आम्ही सगळ्या स्टेप्स बरोबर केल्या पण ममता तेव्हा चुकली...'