लग्नानंतर इंटिमेट सीनबद्दल Nayanthara चा मोठा निर्णय

लग्नानंतर नयनतारा सिनेमांमध्ये देणार इंटिमेट सीन, काय आहे अभिनेत्रीता निर्णय?   

Updated: Jun 13, 2022, 11:37 AM IST
लग्नानंतर इंटिमेट सीनबद्दल Nayanthara चा मोठा निर्णय title=

मुंबई :  साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार नयनताराने विघ्नेश शिवासोबत लग्न केलं. (Nayanthara-Vignesh Shivan Wedding). या दोघांच्या लग्नाबाबत त्यांचे फॅन्स खूप उत्सुक होते आणि आता अखेर त्यांच लग्न झालंय. नयनताराचा वेडिंग लूक पाहून लोकांना प्रियांका चोप्राच्या (Priyanka Chopra) वेडिंग लूक आठवण झाली. लेहंग्याचा ट्रेंड असताना नयनताराने मात्र लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीत ती अप्सराच दिसत होती.

लग्नानंतर नयनताराने घेतला मोठा निर्णय
नयनतारा सिनेमांमधील इंटिमेट सीनपासून दूर राहणार आहे. नयनताराने अभिनेत्यांसोबत ऑनस्क्रीन रोमँटिक सीन न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बॉलिवूड हंगामा नुसार, लग्नानंतर नयनतारा तिच्या डायरेक्टर पतीसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी ब्रेक घेणार आहे. ब्रेकवरून परतल्यानंतर नयनताराने इंटिमेट सीन करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.  यावर अभिनेत्रीने अधिकृत घोषण केलेली नाही. 

नयनतारा आगामी 'जवान' सिनेमामध्ये किंग खान म्हणजे शाहरुख खानसोबत दिसणार आहे. शाहरुख खान सिनेमांमध्ये इंटिमेट सीन्स करणं टाळतो.  त्यामुळे सिनेमात नयनतारा आणि शाहरुखचे इंटिमेट सीन नसतील. 

नयनताराच्या लग्नाबद्दल सांगायचं तर, 9 जून रोजी अभिनेत्रीने चित्रपट निर्माता विघ्नेश शिवनसोबत लग्न केल. मोठ्या थाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. नयनताराच्या लग्नात रजनीकांतपासून शाहरुख खानपर्यंतचे बडे सेलिब्रिटी स्पॉट झाले.