लेडी सुपरस्टार Nayanthara अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर मोठा खुलासा

Nayanthara ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नयनताराला जुळी मुलं असून Uyir and Ulagam अशी त्यांची नावं आहेत. 

Updated: Feb 24, 2023, 11:48 AM IST
लेडी सुपरस्टार Nayanthara अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर मोठा खुलासा title=

Nayanthara is quiting acting : दाक्षिणात्य अभिनेत्री सुरपरस्टार नयनतारा (Nayanthara) ही तिच्या अप्रतिम अभिनयासोबतच तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जाते. नयनतारा गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. त्यानंतर लगेच नयनतारा तिच्या मुलांच्या जन्मामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. नयनतारा ही सगळ्यात शेवटी अभिनेता चिरंजीवी यांच्या 'गॉडफादर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नयनतारानं चिरंजीवी यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. दरम्यान, आता चर्चा अशी सुरु आहे की नयनतारा ही मोठ्या पडद्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. त्याचं कारण तिची जुळी मुलं (Uyir and Ulagam) असल्याचे म्हटले जात आहे. तिला तिच्या मुलांसोबत वेळ व्यथित करायचा आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनताराला आता तिच्या मुलांवर लक्ष ठेवायचे आहे. नयनतारा ही अभिनयापासून लांब राहिली तरी ती गृहिणी राहणार नाही. अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर ही पती विघ्नेशचे प्रॉडक्शन हाऊस 'राउडी पिक्चर्स' सांभाळणार आहे. मात्र, नयनतारा किंवा मग तिच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीनं यावर कोणतीही प्रतिक्रिया किंवा दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, ही बातमी समोर आल्यानंतर नयनताराच्या चाहत्यांना मोठा धक्काबसला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नयनताराचे आगामी प्रोजेक्ट्स

नयनताराच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर तिचा आगामी चित्रपट 'लेडी सुपरस्टार 75' आहे. पण या चित्रपटाला हे नाव देण्याचे कारण असे काही की नयनताराला 'लेडी सुपरस्टार 75' असे म्हणतात. अशात चित्रपटाचं नाव ठरवण्यात आलं नसताना निर्मात्यांनी काही काळासाठी या चित्रपटाला नाव 'लेडी सुपरस्टार 75' ठेवलं आहे. नीलेश कृष्णा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यानंतर नयनताराकडे अल्फोन्स पुथरेनचा 'पटू' हा चित्रपट आहे. यामध्ये ती फहाद फाजीलसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.अजित कुमार यांच्या 'AK62' चित्रपटातही दिसणार आहे. याचे दिग्दर्शन विघ्नेश सिवन करत आहेत. याशिवाय नयनतारानं पुरी जगन्नाथ यांचा 'ऑटो जानी' हा चित्रपटही साइन केला आहे.

हेही वाचा : Akshay Kumar वर का आली भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करायची वेळ? जाणून घ्या कारण

दरम्यान, नयनताराकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत, ज्यामध्ये ती दिसणार आहे. सगळ्यांचे लक्ष हे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या (SHahrukh Khan) 'जवान' कडे आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक अॅटली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय चित्रपटाची शूटिंगही संपण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात. हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटात नयनतारा आणि शाहरुख खानशिवाय दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि अभिनेत्री प्रियमणी देखील दिसणार आहेत.