बॉलीवुड ड्रग्ज प्रकरणी सारा आणि श्रद्धाला समन्स, व्हॉट्सएप चॅट आले समोर

 सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना समन्स 

Updated: Sep 21, 2020, 07:31 PM IST
बॉलीवुड ड्रग्ज प्रकरणी सारा आणि श्रद्धाला समन्स, व्हॉट्सएप चॅट आले समोर  title=

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये नवे खुलासे होत आहेत. याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना समन्स पाठवण्यात येणार आहे. एनसीबीच्या तपासात व्हॉट्सएप चॅट समोर आले आहेत. चॅटमध्ये ड्रग्ज संदर्भात यामध्ये चर्चा सुरु आहे. एनसीबीच्या सुत्रांनुसार श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि सुशांतची टॅलेंट मॅनेजर राहीलेल्या जया शाह यांच्यातील ही चॅट आहे.

सारा आणि श्रद्धाची चौकशी 

सारा अली खानने सुशांत सिंह राजपूतसोबत केदारनाथमध्ये काम केलं होता. तर श्रद्धा कपूरने त्याच्यासोबत छिछोरेमध्ये काम केलं होतं. पुण्यातील डॅमजवळ अभिनेत्रींच्या पार्ट्या व्हायच्या ही माहीती समोर आलीय. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा नोकर दीपेश सावंत यांना अटक करण्यात आलीय. 

एनसीबीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये रियाने सांगितलं की, सुशांत एक ड्रग एडिक्ट झाला होता. तो यामधून बाहेर पडू शकत नव्हता. याच कारणामुळे तिने सुशांतचं घर सोडलं. या दरम्यान लॉकडाऊन आणि सुशांतवर लावण्यात आलेल्या मीटूच्या आरोपावरून तिच्या लक्षात आलं हों की, ती सुशांतसोबत राहिली तर तिचं करिअर खराब होऊ शकतं. यामुळे सुशांतला सोडणंच तिला योग्य वाटलं. 

आपल्या स्टेटमेंटमध्ये रियाने सुशांत आणि साराच्या ड्रग्स घेण्याबाबतचा खुलासा केला आहे. केदारनाथ सिनेमानंतर सुशांतच्या ड्रग्स घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली. रियाच्या माहितीनुसार, सुशांत या अगोदरपासून ड्रग्स घेत होता. असं नाही की केदारनाथ सिनेमांतच त्याने सुरूवात केली पण प्रमाण मात्र यावेळीच वाढलं. 

सुशांत मुंबईत आला तेव्हापासूनच त्याचा सर्कल हा सुपर पार्टी कल्चरचा होता. तेव्हापासूनच ड्रग्स घ्यायला सुरूवात झाली होती. पण तो ड्रग्स एडिक्टेड नव्हता. रियाने सांगितलं की, सुशांत क्युरेटेड मरिजुआनाचे १० ते २० डोस घेत असे. तो पूर्णपणे यावर अवलंबून होता. मीटू आरोपानंतर तो अधिक ड्रग्सचं सेवन करू लागला. आणि लाकडाऊनमध्ये तर तो ड्रग एडिक्ट झाला.