Neena Gupta कोमात? घटस्फोटानंतर Masaba Gupta ने केलं गुपचूप लग्न, Photo Viral

Masaba Gupta Married :  अभिनेत्री नीना गुप्ता शॉकमध्ये आहे. कारण नीना गुप्ताची मुलगी मसाबा हिने गुपचूप लग्न केलं आहे. घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर मसाबाने या अभिनेत्याशी लग्न केलं आहे. लग्नाबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितलं आहे. 

Updated: Jan 27, 2023, 02:40 PM IST
Neena Gupta कोमात? घटस्फोटानंतर Masaba Gupta ने केलं गुपचूप लग्न, Photo Viral
Neena Gupta Daughter Masaba Gupta gets married for second time to Actor Satyadeep Misra Share photos on Instagram

Masaba Gupta And Actor Satyadeep Misra Married  : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या शॉकमध्ये आहे. कारण नीना गुप्ताची मुलगी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने आज सकाळी गुपचूप लग्न केलं आहे. घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर तिने आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मसाबाने इन्स्टाग्रामवर फोटो टाकून सगळ्यांना सुखद धक्का दिला. मसाबा मसाबा या नेटफ्लिक्सवरील वेबसीरीज मसाबाचा जो नवरा दाखवला आहे. तो तुम्हाला आठवतो का? अभिनेता सत्यदीप मिश्रा...हा मसाबाने सत्यदीप मिश्रासोबत गुपचूप लग्न केलं आहे. 

दोघांचंही हे दुसरं लग्न

मसाबा आणि सत्यदीप या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. मसाबाचं बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता मधु मंतेनाशी 2015 मध्ये पहिलं लग्न झालं होतं. लग्नाच्या 4 वर्षांनंतर या दोघांचा घटस्फोट झाला. तर सत्यदीप मिश्रा यांचंही हे दुसरं लग्न आहे. सत्यदीपने अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत लग्न केलं होतं. 2013 मध्ये त्यांचा लग्नाला ब्रेक लागला. 

अशी सुरु झाली लव्हस्टोरी 

मसाबाची लोकप्रियक मालिका मसाबा मसाबा या शोमध्ये सत्यदीप आणि मसाबा प्रेमात पडले.  या शोदरम्यान त्यांच्यामध्ये गप्पा सुरु झाल्या. या संवादातून ते दोघे हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले. सत्यदीप हा अभिनेत्यासोबतच वकील पण आहे.  सत्यदीप 'नो वन किल्ड जेसिका', 'बॉम्बे वेल्वेट', 'चिल्लर पार्टी', 'फोबिया' आणि 'विक्रम वेधा' या चित्रपटांमध्ये दिसला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Masaba (@masabagupta)

रोमँटिक पोस्ट 

मसाबा गुप्ता हिनेही लग्नाचा फोटो पोस्ट करताना एक रोमँटिक पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते, 'आज सकाळी मी शांतीच्या सागरासारख्या मुलाशी लग्न केलंय. आता आयुष्यात प्रेम, शांतता, स्थिरता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मितहास्य असणार आहे. मला मथळा लिहिण्यास मदत केल्याबद्दल देखील धन्यवाद. हा प्रवास खूप चांगला होणार आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Masaba (@masabagupta)

ब्रँड हाउस ऑफ मसाबा

मसाबा गुप्ता एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर असल्याने तिने आणि अभिनेत्याने स्वतःच्या ब्रँड हाउस ऑफ मसाबाच्या नवीन वधूच्या कलेक्शनमधील कपडे घातले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Masaba (@masabagupta)

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसत आहेत.  या आनंंदाच्या क्षणी मसाबाचं संपूर्ण कुटुंब एकत्र दिसलं. 'For the first time ever - My whole life came together' या शब्दात मसाबाने आनंद व्यक्त केला आहे.